शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शहरातील २४ मार्गांवर २४ शहर बस २४ तारखेपासून धावण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:30 IST

महापालिकेच्या शहर बससेवेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देचार बस राखीव ठेवणार नव्या २३ बस लवकरच दाखल होणार

औरंगाबाद : महापालिकेच्या शहर बससेवेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. २३  बस शहरात लवकरच येणार असून, २४ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी केला. 

२४ मार्ग निश्चित करून वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. २८ बसपैकी २४ बस रस्त्यावर धावतील. चार बस राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी एक बस शहर दर्शनासाठी वापरली जाईल. २४ बसमधून १३ बस शाळा-महाविद्यालय वेळापत्रकानुसार, तर ११ बस नागरिकांसाठी धावतील. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सिटीबस सोडण्यात येतील. सिडको, चिकलठाणा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय नियंत्रण कार्यालय, या चार ठिकाणी बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरुवातीला मनपामध्ये ५ बस दाखल झाल्या. २३ बस मंगळवारी संध्याकाळपर्यंत दाखल होतील. एसटी महामंडळाकडून सुरू असलेली सिटीबस पूर्णपणे बंद करून त्याऐवजी मनपाची सिटीबस सुरू होणार आहे. त्याकरिता एसटी महामंडळासोबत अंतिम करार केला जाणार असून, ५० वाहक व चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बसचे वेळापत्रक लावण्यासाठी ३७० पोल बसविले जातील. त्यासाठी १४ जानेवारीपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील. नियंत्रण कार्यालयासाठी रेल्वे स्टेशन रोडवरील पर्यटन कार्यालयामागील जागा, राखी टॉवरमागील जागा, आमखास मैदान, मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र हॉल यापैकी एक जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. 

विविध घटकांसाठी आरक्षणाची सोय सिटीबसमध्ये अंपगांसाठी चार सीट, स्वातंत्र्यसैनिक २, ज्येष्ठ नागरिकांसाठी २ सीट, तर महिलांसाठी चार सीट आरक्षित असणार आहेत. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpassengerप्रवासीroad safetyरस्ते सुरक्षा