परभणी : जिल्हा पोलिस दलातील २३६ पोलिस कर्मचाऱ्यांना नूतन पोलिस अधीक्षकांनी पदोन्नतीची भेट दिल्याने त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या वर्षभरापासून रखडल्या होत्या. पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी महिनाभरापूर्वी परभणी येथील अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न हाताळत स्वातंत्रदिनी या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. ५१ पोलिस हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती दिली आहे. तर ८८ पोलिस नाईक कर्मचाऱ्यांना पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस शिपाई असलेल्या ९७ कर्मचाऱ्यांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
२३६ पोलिसांना पदोन्नती
By admin | Updated: August 21, 2014 23:19 IST