शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

२३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

बिलोली : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिलोली : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी २३ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यात सन २०१३-१४ अंतर्गत अकरा आणि सन २०१४-१५ अंतर्गत बारा शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिली.ऐनवेळी ठरलेल्या या कार्यक्रमाला माजी आ. गंगाराम ठक्करवाड, सभापती सुभाष पाटील, उपसभापती व्यंकट पाण्डवे, सुभाष गायकवाड आदी हजर होते. सोहळ्याच्या निमित्ताने कवी प्रा. मनोज बोरगावकर यांचे व्याख्यान झाले. सन २०१३-१४ अंतर्गत रामदानी शेख समदानी (अटकळी), दत्ता मारोती नायगावे (बिजूर), एस. ए. हंबरडे (हरनाळा-दुगाव), रेखा निवृत्ती गुटूरकर (तळणी), सोमपुरे शेषाबाई दत्तराम (कार्ला), गोपाळ भगवंत चव्हाण (बेळकोणी), बेबीसरोजनी रघुनाथ होटकर (हुनगुंदा), एस. व्ही. कळसकर (थडीसावळी), भाग्यश्री रामराव डिडेवार (कुंडलवाडी), मुमताज बेगम फत्ते महमंद (कुंडलवाडी), मनोहर संभाजी देशमुख (लोहगाव), त्याचप्रमाणे सन २०१४-१५ अंतर्गत रमेश नागन्ना करोड (नागणी), संतोष विठ्ठल पांचाळ (हिंगणी), शितल इरवंतराव भालेवार (केसराळी), नागेश्वर शंकरराव कुऱ्हाडे (केसराळी), बाबूराव संभाजी ढगे (केरुर), जगन्नाथ पांडुरंग दिंडे (चिरली), झियोओद्दीन इरफान गफ्फार (कुंडलवाडी), एन.डब्ल्यू. सुभानकर (दुगाव), पी.एन. केसराळीकर (रामतीर्थ), एकनाथ पांडुरंग कौठेकर (लोहगाव), उमेश मोहनराव दोमाटे (बिलोली) या सर्व जिल्हा परिषदेअंतर्गत शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी एम. के. बिचकुले, माजी सदस्य शंकर काळे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता हांडे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष आबाराव संगनोड आदी हजर होते.गटशिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. विस्तार अधिकारी डी. व्ही. धुळशट्टे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)नवीन नांदेडात शिक्षक दिन उत्साहातनवीन नांदेड : शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के. पी. पल्लेवाड यांची, तर उपमुख्याध्यापक अशोक मादळे व पर्यवेक्षक अशोक लघुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.जी. पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी वसंत वाघमारे, कैलास माने, सुभाष भवर, एम.जी. जाधव, जाधव, कापसे यांनी परिश्रम घेतले.कुसुमताई विद्यालययेथील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संभाजी बिरादार यांची तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेच्या सहसचिव शशिकला बिरादार, मुख्याध्यापक के.ए. जोशी, सहशिक्षिका उज्ज्वला सावते, वंदना सोनाळे, सुमती व्यवहारे, सुनंदा वाघमारे, उषा कारामुंगे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सहशिक्षक पी.जी. लाळे, व्ही.डी. बिरादार व एस.डी. कऱ्हाड यांना संस्थेअंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सहशिक्षक अरविंद राठोड व वासंती वझरकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वास हंबर्डे तर अर्जुन गुंडाळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मेरवान जाधव, मारोती पेन्टे, लक्ष्मण येसके, आनंदा हिवराळे यांनी सहकार्य केले.इंदिरा गांधी हायस्कूल इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एल. माचलोड यांची तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपमुख्याध्यापिका व्ही. सी. देशमुख, पर्यवेक्षक विठ्ठल भंडारे, बबन जाधव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. निलेवार, भागिरथी बच्चेवार, सिंधू तिडके, माया जयस्वाल, वर्षा गायकवाड, वसुंधरा नलेवाड, अमर बायस, विनोद जमदाडे, ललिता कोल्हेवाड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक नेहा कोलगाडगे यांनी, सूत्रसंचालन कांचन कदम तर प्रज्ञा लोंढे यांनी आभार मानले.