शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

घाटीत २२ हजार सदोष इंजेक्शनचा झाला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:39 IST

घाटी रुग्णालयात काळपट आणि बुरशीसदृश दोष आढळून आलेल्या २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरवठा झालेल्या ८० हजारपैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवण्यात आला आहे. दोष आढळून येण्यापूर्वीच रुग्णांना इंजेक्शन दिले गेले.

ठळक मुद्दे धक्कादायक : ८० हजार पैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवला

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात काळपट आणि बुरशीसदृश दोष आढळून आलेल्या २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरवठा झालेल्या ८० हजारपैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवण्यात आला आहे. दोष आढळून येण्यापूर्वीच रुग्णांना इंजेक्शन दिले गेले. परिणामी रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन होण्याची भीती व्यक्त होत आहे; परंतु एकाही रुग्णाकडून काही तक्रार आलेली नसल्याचा दावा घाटी प्रशासनाने केला आहे.रॅनिटिडीन नावाचे संबंधित सदोष इंजेक्शन वापरण्यात येऊ नये, असे २२ नोव्हेंबर रोजी वॉर्डांमध्ये कळविण्यात आले, तरीही अनेक इंजेक्शन वॉर्डांमध्येच राहिले. औषध प्रशासनाने २० हजार इंजेक्शनचा साठा २६ नोव्हेंबरला गोठवला होता. उर्वरित इंजेक्शन्स वॉर्डातून परत घेण्याचे काम मंगळवारी करण्यात आले. त्यातून ३८ हजार इंजेक्शन्स औषधी भांडारकडे परत आले. तेव्हा गोठविलेल्या इंजेक्शनची आकडेवारी ५८ हजारांपर्यंत गेली. उर्वरित इंजेक्शनचे काय झाले, याचा घाटी प्रशासनाने गुरुवारी आढावा घेतला. त्यातून २२ हजार इंजेक्शनचा गेल्या काही दिवसांत वापर झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.घाटी रुग्णालयाला ‘हाफकिन’कडून आॅक्टोबरमध्ये ८० हजार इंजेक्शनच्या चार बॅचचा पुरवठा करण्यात आला होता. अनेकदा रुग्ण काही खाऊ शकत नाही. प्रतिजैविकांचे इंजेक्शन दिल्यानंतर अनेकदा रुग्णांच्या पोटात आग होते. रुग्णांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. अशावेळी रुग्णांना रॅनिटिडीन इंजेक्शन दिले जाते. घाटीतील अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभागासह विविध वॉर्डांमध्ये या इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. इंजेक्शनचा वापर होत असताना २२ नोव्हेंबर रोजी काही इंजेक्शनमध्ये बुरशीसदृश काळा भाग कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यामुळे इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची सूचना करण्यात आली. इंजेक्शनच्या आरटी १८२४, १८२२, १८२३ यामध्ये प्रामुख्याने हा दोष आढळला. या बॅचसह खबरदारी म्हणून आरटी १८२६ या बॅचचा वापरही थांबविण्यात आला.इंदूर येथील नंदानी मेडिकल लॅब्रोटरिस प्रा. लि. ने या इंजेक्शनचे उत्पादन घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाचा तपासणी अहवाल आल्यानंतरच इंजेक्शनमधील नेमका दोष स्पष्ट होणार आहे. इंजेक्शनच्या उत्पादनात दोष आढळून आल्यास मध्यप्रदेशातील अन्न व औषध प्रशासन पुढील कारवाई करतील, अशी माहिती औषध प्रशासनातर्फे देण्यात आली.तात्काळ रिअ‍ॅक्शन येतेसदोष औषधी, इंजेक्शनच्या वापरामुळे त्वचेवर चट्टे पडणे, उलट्या-जुलाब यांसह विविध त्रास होत असतो. बहुतांश वेळी त्याची तात्काळ प्रतिक्रिया येत असते; परंतु घाटीतील सदोष इंजेक्शनच्या वापराचा काही त्रास झाला, अशी काहीही तक्रार आलेली नाही आणि यापुढेही येईल, अशी शक्यता नाही. दूरगामी परिणामाचीही शक्यता नाही. त्यामुळे कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.इंजेक्शनची परिस्थितीबॅच क्रमांक पुरवठा गोठवला वापरआरटी १८२२ ८,६०० ८,६०० -आरटी १८२३ १९,००० १०,१०५ ८,८९५आरटी १८२४ ३२,८५० २३,८१४ ९,०३६आरटी १८२६ १९,५५० १५,८३५ ३,७१५एकूण ८०,००० ५८,३५४ २१,६४६रुग्णांची काहीही तक्रार नाहीघाटीत ८० हजारपैकी २२ हजार रॅनिटिडीन इंजेक्शनचा वापर झालेला आहे; परंतु यामुळे रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन झाल्याची अद्याप तक्रार आलेली नाही. आरटी-१८२६ या बॅचमधील इंजेक्शनमध्ये काहीही आढळून आलेले नाही. खबरदारी म्हणून त्याचा वापर थांबविण्यात आला.- डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)खबरदारीचा उपायसगळेच इंजेक्शन सदोष आहेत, असे आताच म्हणता येणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व इंजेक्शनचा साठा गोठविण्यात आला. इंजेक्शन दिल्याने रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन झाले का, हे पाहावे लागेल. तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होईल,अशी माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं