केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यात २०१४ च्या ८ मार्च रोजी झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होवून रब्बीतील गहू, हरबरा, कापूस, तुर, संत्रा, पिके भूईसपाट झाली होती. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले. यात बटवाडी ९ लाख ३५ हजार, गोंधनखेडा १८ लाख ९८ हजार, हिवरा ४ लाख ६५ हजार, केंद्रा बु. १७ लाख ९२ हजार, केंद्रा खु. १३ लाख ९५ हजार, वलाना ३९ लाख १३ हजार, मन्नास पिंपरी ७ लाख ४६ हजार, वरखेड १५ लाख ४९ हजार, जामठी बु. १६ लाख ५ हजार, ताकतोडा १७ लाख ४४ हजार, कहाकर बु. २२ लाख ४३ जहार या गावातील शेतकऱ्यांना पीडीसीसी बँक शाखा केंद्रा बु.च्या वतीने सुरळीत वाटप करण्यात आले. बँकेतील शाखाधिकारी आर.जी. कावरखे, लोण आॅफीसर आर.एस. जाधव, सहाय्यक प्रदीप पाटील, भाकरे यांनी इतर सर्व बँकेचे व्यवहार करीत गारपीट अनुदान वाटपसाठी परिश्रम घेतले. सध्या बँकेत मागील वर्षी जून ते आॅक्टोबर या कालावधीत ६ वेळा अतिवृष्टी झाली होती. त्यांचे अनुदान प्रत्येक गावाला टप्प्याटप्याने वाटप कण्यात येत आहे. (वार्ताहर)
गारपीटग्रस्तांना २.२0 कोटींची मदत
By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST