शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बसद्वारे २,१४४ चालक-वाहकांचा रोज १५ हजार प्रवाशांबरोबर संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 12:11 IST

corona virus दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क होऊनही चालक-वाहकांच्या लसीकरणाचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्दे स्वत:च्या सुरक्षेसाठी चालक-वाहकांना मास्क, सॅनिटायझरवर स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे.प्रवासामध्ये हजारो प्रवाशांबरोबर संपर्क होताे. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना म्हटला की भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. गर्दीत जाण्याचे टाळा, असा सल्लाही दिला जातो. पण एसटी महामंडळाचे कोरोनायोद्धा चालक-वाहक स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र प्रवासी सेवा देत आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार १४४ चालक-वाहक रोज जवळपास १५ हजार प्रवाशांच्या संपर्कात असतात. परंतु त्यांना एसटी महामंडळाकडून ना सॅनिटायझर दिले जाते, ना मास्क दिले जातात. त्यांच्या लसीकरणाचाही विचार होत नसल्याची स्थिती आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून शहरांपासून तर अगदी दुर्गम खेड्यापाड्यातही बससेवा दिली जाते. सण, उत्सवातही एसटीचे चालक-वाहक कर्तव्य बजावतात. गेल्या वर्षभरापासून कोरोना विळखा पडलेला आहे. या विळख्यातही एसटी अवितरपणे सेवा देत आहे. चालक-वाहकांच्या बळावरच ही सेवा सुरू आहे. परंतु त्याच चालक-वाहकांना पुरेसे सुरक्षा कवच देण्याकडेच सध्या दुर्लक्ष होत आहे. हजारो प्रवाशांच्या संपर्कात राहूनही चालक-वाहकांची कोरोना तपासणी होत नाही. प्रत्येक आगारातून मुंबईला चालक-वाहक पाठविले जातात. मुंबईहून आल्यानंतर त्यांच्याही तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणे आढळली तर तपासणी असा पवित्रा दिसतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पण आम्हाला लस कधी मिळणार, असा सवाल चालक-वाहकांकडून विचारला जात आहे.

लसीकरणासंदर्भात अद्याप निर्णय नाही लसीकरणासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. ज्या चालक-वाहकांना कोरोनाची लक्षणे आढळतात, त्यांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात साधारण १५ ते २० हजार प्रवासी रोज प्रवास करतात. मास्क, सॅनिटायझर पूर्वी पुरविले होते. परंतु आता ते कर्मचाऱ्यांना घ्यावे लागते.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

आजार वाढला तर कोण जबाबदारमुंबईला कर्तव्यासाठी पाठविण्यात आले. तेथून परत आल्यानंतर साधी कोरोना तपासणी केली नाही. तपासणी न करताच दुसऱ्याच कर्तव्यावर जाण्यास सांगितले जाते. त्यातून आजार वाढला तर कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे.- एक वाहक

तरीही आम्ही कर्तव्य बजावतोदररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोणाला कोरोना झालेला असेल काहीही सांगता येत नाही. तरीही आम्ही कर्तव्य बजावतो. पण साधा मास्क देण्याचाही प्रशासन विचार करीत नाही. यापुढे तरी त्याचा विचार केला पाहिजे.- एक चालक

१५ हजार प्रवाशांचा रोज प्रवासएसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५५० बसगाड्यांचा ताफा आहे. रोज साधारण ६ हजार २२२ फेऱ्या होतात. या सर्व बसमधून जिल्ह्यातून साधारण रोज १५ हजार प्रवासी प्रवास करतात. अनेकदा हा आकडा २० हजारांपर्यंत जातो.

लक्षणे आढळली तर तपासणीप्रवासामध्ये हजारो प्रवाशांबरोबर संपर्क होताे. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका आहे. पण कोरोना सदृश लक्षणे आढळल्यानंतरच एसटी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यातूनच अनेकदा त्रास वाढल्यानंतर कोरोना तपासणी हाेत असल्याची परिस्थिती आहे.

लसीकरण कधी?१) दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क होऊनही चालक-वाहकांच्या लसीकरणाचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.२) लस घेण्यास अनेक एसटी कर्मचारी उत्सुक आहेत. परंतु एसटी महामंडळ आणि शासन त्याचा विचार करीत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मास्क, सॅनिटायझरवर होणारा खर्च खिशातून१)गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सुरुवातीला महामंडळाकडून चालक-वाहकांना मास्क ,सॅनिटायझर देण्यात आले. परंतु नंतर ते देणे बंदच झाले.२) स्वत:च्या सुरक्षेसाठी चालक-वाहकांना मास्क, सॅनिटायझरवर स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे.३) एसटी महामंडळाने चालक-वाहकांना किमान काही प्रमाणात कोरोनाची ही सुरक्षा साधने देण्याची मागणी होत आहे.

वाहक-९३१चालक-१२१३रोजच्या फेऱ्या -६,२२२ 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या