परभणी : जास्त पैसे मिळण्याचे अमिष दाखवून कल्याण नावाचा मटका चालवित असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी शहरात दोघांवर कारवाई करीत २१ हजार रुपये जप्त केले.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला माळी गल्ली येथे मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अधारे पथकाने छापा टाकला असता बाळू गोपाळराव वैध (रा.साखला प्लॉट) आणि संतोष बालाजी काळे (रा. माळी गल्ली) हे लोकांकडून पैसे घेऊन जास्तीचे पैसे मिळण्याचे अमिष दाखवून कल्याण नावाचा मटका चालवित असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून २१ हजार १०० रुपये जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इरफान इनामदार, सुरेश डोंगरे, सखाराम टेकुळे, निलेश भुजबळ, शब्बीरखाँ कबीरखाँ पठाण, किशोर चव्हाण, शिवा धुळगुंडे आदींनी केली. (प्रतिनिधी)
मटकाचालकांकडून २१ हजार जप्त
By admin | Updated: September 20, 2014 00:06 IST