शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. कळंब उपविभागातील २१ शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच एकरकमी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतला आहे. वर्षोगणती नियमितपणे वीजबिले न भरल्यामुळे लातूर परिमंडलात कृषिपंपाची थकबाकी १५०० कोटीच्या वर पोहोचली आहे. या थकबाकीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व यापुढे नियमितपणे वीजबिले भरण्याची सवय लावण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी २०१४ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील गौर येथील गवळी बंधूनी सर्वप्रथम ५० टक्के रक्कम भरली. त्याबद्दल दहिफळचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत जाधव व तत्कालिन उपकार्यकारी अभियंता एन. आर. खान यांनी गवळी बंधूचा गौरव केल्याने गौर येथील अन्य प्रभू गवळी, वसंत अंधारे, दत्तात्रय देशमुख, रमेश धोंगडे, मुकुंद देशमुख यांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यांचाही महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील मंगरुळ येथील उर्मिला जयंत कुंभार व विठ्ठल सुडके यांनीही एकरकमी ५० टक्के रक्कम भरली. खामसवाडी येथील इंदू रामा सोनवणे, कन्हेरवाडीचे मारुती कवडे, माळकरंजा येथील दिनकर जाधव, परमेश्वर लोमटे तसेच तालुक्यातील बाळासाहेब गायकवाड, बजरंग शिंदे, राजेंद्र कसपटे, किरण आडसूळ, भास्कर आडसूळ, शशीकला भानुदास या शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)अशी आहे कृषी संजीवनी योजनाशासनाच्या कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निव्वळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठीही तीन हप्ते पाडून देण्यात आले आहेत. आॅगस्टपर्यंत ५० टक्के एकरकमी भरता येतील. अन्यथा आॅगस्टमध्ये २० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास सप्टेंबरमध्ये २० व आॅक्टोबरमध्ये १० टक्के या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. दंड व व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून महावितरणला मिळणार आहे.