उस्मानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी नुकतीच करण्यात आली असून, यात २०७ गावातील पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. याचे प्रमाण जिल्ह्यात २१ टक्के आहे.जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडून दर महिन्याला जिल्ह्यातील सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ९५४ नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी २०५ स्त्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १२६ स्त्रोतांचे पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ५२ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य नाही. तसेच तुळजापूर तालुक्यातील १८४ पैकी १९ , परंडा तालुक्यात ६८ पैकी १९, कळंब १३३ पैकी २३, भूम १२३ पैकी २७, लोहारा ८३ पैकी ११, वाशी ८५ पैकी १९ स्त्रोतांचे पाणी दूषित आढळून आले. तसेच दूषित पाण्याचे प्रमाण २१ टक्के असल्याचे जिल्हा प्रयोग शाळेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)भूम तालुक्यातील अंभी, ईट, माणकेश्वर, पाथ्रूड, वालवड, कळंब तालुक्यातील दहिफळ, ईटकूर, मंगरुळ क., मोहा, शिराढोण, येरमाळा, लोहारा तालुक्यातील आष्टा का, जेवळी, कानेगाव, माकणी, उमरगा तालुक्यातील आलूर, मुळज, नाईचाकूर, येणेगूर, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, ढोकी, जागजी, केशेगाव, कोंड, पाडोळी, पाटोदा, पोहनेर, समुद्रवाणी, येडशी, परंडा तालुक्यातील आसू, अनाळा, जवळा नि, शेळगाव, तुळजापूर तालुक्यातील अणदूर, जळकोट, काटगाव, मंगरुळ तु, नळदुर्ग, सलगरा, सावरगाव, वाशी तालुक्यातील पारा व पारगाव जिल्ह्यातील एकूण ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २०७ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.
२०७ गावांत दूषित पाणी
By admin | Updated: September 12, 2014 00:25 IST