शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे गतिमान सेवेसाठी २०३ नवीन टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:46 IST

मोबाइल नेटवर्कही अद्ययावत करून गतिमान सेवा देण्यासाठी बीएसएनएल सरसावली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात नवीन १५८ ३-जी आणि ४५ नवीन २-जी टॉवर उभारण्यात येणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मोबाइल नेटवर्कही अद्ययावत करून गतिमान सेवा देण्यासाठी बीएसएनएल सरसावली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात नवीन १५८ ३-जी आणि ४५ नवीन २-जी टॉवर उभारण्यात येणार आहेत. हे टॉवर उभारल्यानंतर एका सेकंदाला १०० एमबीपीएसपेक्षा जास्त डाटा डाऊनलोड केल्या जाऊ शकतो. एवढी अफाट गती प्राप्त होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, टॉवर २-जी व ३-जी असले तरी प्रत्यक्षात ते ४-जी व ५-जीची सेवा पुरविण्यासाठी तेवढेच सक्षम असणार आहेत. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत टॉवर उभारणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती बीएसएनएलचे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी दिली.नोव्हेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषद वडनेरकर यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ३-जीचे ३७२८ आणि २-जीचे १५०० टॉवर उभारण्यात येणार आहेत. यात १२०० कोटी खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान देणा-या नोकियाला देण्यात आला आहे.मोबाइल बाजारात अटातटीची स्पर्धा सुरू असूनही बीएनएनएलने मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात ३२५०० नवे ग्राहक जोडले आहेत. तसेच आता जिथे ब्रॉडबँड सेवा पुरविल्या जाऊ शकत नाही. तिथे केबल टीव्ही आॅपरेटरच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल्सवर हायस्पीड ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार आहे.यासाठी प्रथम खुलताबाद व वाळूज अशा दोन ठिकाणच्या टीव्ही केबल आॅपरेटरसोबत करार करण्यात येत आहे. याद्वारे जिल्ह्यात यावर्षी ५० हजारांपेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्शन जोडले जातील. बीएसएनएल आता एका सामान्य सरकारी नोकरशाही दृष्टिकोन असलेली संस्था राहिली नसून ग्राहक केंद्रित व ग्राहकाभिमुख बनली आहे. मागील काही वर्षांत हा बदल घडून आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.