शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींचा बोजा

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीने तीन वर्षांपासून गटांगळ्या खाल्ल्या.

 विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीने तीन वर्षांपासून गटांगळ्या खाल्ल्या. सप्टेंबर २०११ ते मे २०१४ या काळात वाढलेल्या जिल्हा दरसूचीप्रमाणे योजनेची किंमत सुमारे २०० कोटी रुपयांनी वाढली आहे. ही रक्कम कुणाच्या हलगर्जीपणामुळे वाढली आहे हा संशोधनाचा विषय असला तरी २०० कोटींचा बोजा नागरिकांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०११ मध्ये काम सुरू झाले असते तर आजघडीला ७० टक्के योजनेचे काम पूर्ण झाले असते. खाबूगिरीच्या राजकारणात जलवाहिनीच्या कामाची किंमत १००० कोटी रुपयांच्या जवळपास गेली आहे. हा भुर्दंड औरंगाबादकरांच्याच माथी येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने १६२ कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी देऊन तीन वर्षे झाले आहेत. त्यावर ६० कोटींचे व्याजही जमा झालेले आहे. शहरातील १३ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झालेले असताना मात्र योजनेचे राजकारण झाले. भागीदारांमध्ये पैशांवरून झाला वाद कंपनीचे भागीदार एसीडब्ल्यूयूसीएलचे सीईओ अशोक अग्रवाल, एसपीएमएलचे सीईओ अमानुल्लाह, एसीडब्ल्यूयूसीएलचे भागीदार सुशील सेठी, ऋषभ सेठी, व्यंकटरामन, खा. संजय काकडे, क्रिसिलचे राकेश बंगेरा, अपीजी पाराशर, अर्जुन कदम, प्रतीक गांधी, एनएसडब्ल्यूसी, व्ही-टेक, वॅबॅगचे प्रतिनिधी मित्तल यांच्यात आर्थिक भागीदारीतून २०१३ मध्ये बिनसले. ३० एप्रिल २०१३ पर्यंत काम सुरू करा, अन्यथा कंत्राट तोडून मोकळे व्हा, अशी नोटीस आयुक्त डॉ़ कांबळे यांनी एसीडब्ल्यूयूसीएलला दिली होती. त्यांच्या नोटीसमुळे कंत्राटदारांचे खरे रूप औरंगाबादकरांसमोर आले. योजनेतील करार, भांडणे, कोर्टवारीचा प्रवास असा... २२ मार्च २०११ रोजी समांतरची निविदा मंजूर झाली. सप्टेंबर २०११ मध्ये सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लि़ (एसपीएमएल) सोबत कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट झाले.कंपनीने आॅक्टोबर २०११ मध्ये फ्रँ किंग करून पालिकेची ७ कोटी ५० लाखांची ईएमडी भरली़ मनपाने कंपनीला एप्रिल २०१२ पर्यंत प्री-पिरेटरी पिरियड दिला़ दरम्यान, एसपीएमएलने स्पेशल पर्पज व्हेईकलअंतर्गत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची स्थापना केली. १ मे २०१२ रोजी योजनेचे काम सुरू होणे गरजेचे होते़ १ जानेवारी २०१३ रोजी मनपाने ती योजना व शहरातील पाणीपुरवठ्याचे काम एसीडब्ल्यूयूसीएलकडे (औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी) विनाकरार, तांत्रिक सक्षमता नसताना हस्तांतरित केले़ ७ जानेवारी २०१३ पासून योजनेचे काम बंद पडले. त्यानंतर जायकवाडीत कॉफर डॅमचे काम करण्यात आले. आयुक्त डॉ. कांबळे यांनी ३० एप्रिलपर्यंत काम सुरू करण्यासाठी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदार बदलण्याचे आदेश दिले. कंपनी आणि मनपात कोर्टवार्‍या सुरू झाल्या.