शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घाटी खरेदी करणार २० लाखांची औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:13 IST

घाटी रुग्णालयास औषधी टंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच घाटी प्रशासनाने स्थानिक स्थरावर २० लाखांची औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयास औषधी टंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच घाटी प्रशासनाने स्थानिक स्थरावर २० लाखांची औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’ कंपनीकडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे.

आरएल, एनएस हे सलाईन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषधही उपलब्ध नाही. प्रतिजैविके नाहीत. शहरात दररोज दहा ते पंधरा जणांना मोकाट कुत्रे चावा घेत आहेत, तरीही अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) उपलब्ध होत नाही. मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. कफ सिरपदेखील उपलब्ध नाही. बेटाडिनसारखे प्राथमिक वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालयात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे. किमान महिनाभर हाफकिनकडून औषधींचा पुरवठा होण्याची परिस्थिती नाही. घाटी रुग्णालयास २०१८-१९ वर्षासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पंधरा दिवस पुरेल इतकी औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicinesऔषधंgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी