शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेमधील १९०० एसटी कर्मचा-यांची होणार वेतन कपात, कर्मचारी संघटना करणार विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:10 IST

एसटी महामंडळाने संपकरी कर्मचा-यांची ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे२६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या वेतन कपातीला औरंगाबादेत विरोध होत असून, एसटी कर्मचा-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : एसटी महामंडळाने संपकरी कर्मचा-यांची ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. २६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या वेतन कपातीला औरंगाबादेत विरोध होत असून, एसटी कर्मचा-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी १७ ते २० आॅक्टोबरदरम्यान संप करण्यात आला. या चार दिवसांच्या कालावधीत औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यातील ५०० बसेसपैकी एकही बस बसस्थानकाबाहेर पडली नाही. २६०० पैकी १९०० कर्मचारी संपात सहभागी झाले. झालेल्या नुकसानीबद्दल प्रत्येक दिवसासाठी ८ दिवस याप्रमाणे एसटीच्या या संपकरी कर्मचा-यांचे ३६ दिवसांची वेतन कपात करण्याचा निर्णय  सोमवारी (दि.३०) एसटी महामंडळाने घेतला. यामध्ये या महिन्यात ४ दिवसांचा पगार कापला जाईल. उर्वरित ३२ दिवसांचा पगार पुढील ६ महिन्यांत कापला जाणार आहे. या निर्णयाची माहिती पोहोचताच कर्मचारी आणि संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटले.

निर्णयानुसार कपातवेतन कपातीसंदर्भात महामंडळाच्या अधिका-यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आणि आदेशानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांची वेतन कपात केली जाईल.- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

संघटनेचा विरोध३६ दिवसांच्या वेतन क पातीला संघटनेचा विरोध आहे. हा विरोध कशा पद्धतीने करायचा हे संघटनेच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ठरविले जाईल.- राजेंद्र मोटे, विभागीय सचिव, मान्यताप्राप्त, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

न्यायालयात दाद‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार ४ दिवसांऐवजी थेट ३६ दिवसांची वेतन कपात होणार असेल तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. प्रसंगी त्यासाठी न्यायालयात धाव घेतली जाईल.- सुरेश जाधव, राज्य संघटक सचिव, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

ही तर हुकूमशाहीकर्मचा-यांनी हक्कासाठी संप केला. वेतनवाढ करण्याऐवजी ३६ दिवसांची वेतन कपात करण्याच्या निर्णयाला हुकूमशाहीच म्हणावे लागेल. वेतन कपात केली तर पुन्हा आंदोलन केले जाईल.- अजयकुमार गुजर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना