शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 09:10 IST

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता.

पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून गुरुवारी रात्री २५ हजार क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे  जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस  झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्याने जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. आवक वाढत असल्याने विसर्गात वाढ केल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया रात्री सुरूच होती. धरणाचे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटाने उचलण्यात आले आहेत.

गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धरणाचा जल साठा ९९.२८% होता अचानक एका तासात जलसाठ्याने शंभरी ओलांडल्याने धरणातून विसर्ग १८००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून २५ हजाराचा विसर्ग वाढविण्यात आल्याचा संदेश धरण नियंत्रण कक्षात येऊन धडकला. अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे तातडीने धरणावर हजर झाले. धरणातून ७५,४५६ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचे आदेश काळे यांनी दिले. धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड, बंडू आंधारे व तांत्रिक पथकाने धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू केली रात्री १० वाजेपर्यंत ४०, हजारा पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता,तर रात्री उशिरा तो वाढवून ७५,४५६ करण्यात आला.

मुळाचे पाणी २२ तासात होते दाखल...मुळा धरणातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान २५ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता.  विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नगर पाटबंधारे विभागाने वर्तविली असल्याने जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. मुळा ते पैठण १०१ किलोमीटर अंतर असून  मुळाचे पाणी जायकवाडी धरणात २२ तासात दाखल होते. परंतु सध्या नदी भरलेली असल्याने १५ तासाच्या आत हे पाणी जायकवाडी धरणात येईल अशी शक्यता बुद्धभूषण दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.

पैठण तालुक्यातील १४ गावांना इशारा

जायकवाडी धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना पैठण तालुक्यातील पैठण कावसान, तेलवाडी चनकवाडी पाटेगाव दादेगाव, वडवाळी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड व हिरडपुरी या गावातील नागरिकांना  सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावरील मालमत्ता गुरे ढोरे दुर घेऊन जावेत असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी