शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१८ दिवस एसटीची ‘हंगामी’ भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:47 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहनकडून दिवाळी सणानिमित्त हंगामी भाढेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दहा ते वीस टक्क्यांनी बसच्या तिकीटात दरवाढ करण्यात आल्याने ऐन सणासूदीत प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहनकडून दिवाळी सणानिमित्त हंगामी भाढेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दहा ते वीस टक्क्यांनी बसच्या तिकीटात दरवाढ करण्यात आल्याने ऐन सणासूदीत प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. १४ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत ही भाढेवाढ राहणार असल्याचे हिंगोली आगाराकडून सांगण्यात आले.ऐन दिवाळीच्या सणात भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. १८ दिवस ही भाडेवाढ सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा नेहमीच्या तिकीट दरापेक्षा जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीत सुट्यांच्या कालावधीत खाजगी बसकडून मोठी भाडेवाढ केली जाते. दिवाळी सण जवळ येताच मायदेशी परतण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असते. परंतु ऐन सणासुदीत तिकिटातील दरवाढीचा फटका सहन करावा लागतो. विशेष म्हणजे खाजगी बस कंपन्यांची भाढेवाढ तर गगनभरारीच घेते. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास ब्रिदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळानेही दिवाळीमध्ये तात्पुरती दरवाढ केल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली अगारातर्फे केले आहे.दिवाळी हंगाम संपल्यानंतर १ नोव्हेंबरपासून पूर्वी लागू असलेल्या दराने प्रवासीभाडे आकारले जाणार आहे. महामंडळाने केलेली हंगामी भाढेवाढ कालावधीत विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक तसेच स्थानकप्रमुख यांना दरवाढ आकारणी काटकोरपणे करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत विभागीय कार्यालयाकडून दरपत्रक व कर्मचारी व अधिकाºयांनी हंगामातील नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. हंगाम संपताच प्रवाशांकडून मूळ प्रवासभाढे आकारले जाणार आहेत.तुळजापूर यात्रेसाठी जादा बसेसतुळजापूर यात्रेसाठी हिंगोली आगारातील १३ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ४ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत जादा बसेस धावणार असून कर्मचाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेकडे जाणाºया भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आगारातर्फे नियोजन करण्यात आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सोडली जाईल.