शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

मराठवाड्यात १७३१ कोरोना रुग्ण वाढले; ३२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:26 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २८, ८०२ झाली

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ जण कोरोनामुळे दगावले आहेत़

औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी १७३१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद + ४२७   औरंगाबाद : जिल्ह्यात   तब्बल ४२७ नव्या रुग्णांची भर पडली. तर पत्रकारासह जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण  रुग्णांची संख्या २८, ८०२ झाली असून एकूण मृत्यूची संख्या ८१५ झाली आहे.

नांदेड + ३५३ नांदेड : जिल्ह्यात ३५३ बाधित रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ जण कोरोनामुळे दगावले आहेत़  सोमवारी ३४१ कोरोनाबाधितांना  सुटी देण्यात आली़ आतापर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ७९६ एवढी झाली आहे़  सोमवारी एकूण १ हजार ६२ अहवालापैकी ६६५ अहवाल  निगेटिव्ह आले़ तर ३५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला़ 

बीड + २२८  बीड : जिल्ह्यात  २२८ बाधितांची भर पडली असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण  रुग्णांची संख्या ७०१९ झाली असून एकूण मृत्यूची संख्या २०३ झाली आहे.

जालना + ९९जालना : जिल्ह्यात ९९ रूग्ण आढळून आले असून तीन बाधितांचा सोमवारी मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६९ झाली आहे. जिल्ह्यात सहा हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्या पैकी कोरोनावर मात केलेल्या रूग्णांची संख्या ही पाच हजार १०६ एवढी आहे. 

परभणी + १८६  परभणी : जिल्ह्यात १८६  रुग्ण आढळले असून, ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता ४ हजार १०७ रुग्ण झाले असून, त्यापैकी १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार २०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लातूर + २५० लातूर : जिल्ह्यात २५० बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आता बाधितांचा आलेख १२ हजार ५१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, यातील ९ हजार १४३ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ३६२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

उस्मानाबाद + १६३ उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी ६ मृत्यूची नोंद झाली आहे़ याशिवाय, आणखी १६३ बाधितांची भर पडली आहे़ यात सर्वाधिक ५४ रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात आढळले़  एकूण बाधितांची संख्या ८६९७  झाली असून २५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली + २५हिंगोली : जिल्ह्यात एकाचा  मृत्यू झाला असून नवे २५ रुग्ण आढळले. आतापर्यंत २१४३ रुग्ण आढळले असून यापैकी १६४१ जण बरे झाले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद