शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CornaVirus : १७० वर्षाच्या परंपरेला पडला खंड; अजिंठा येथे श्रीराम नवमी साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:34 IST

जगाला कोरोना मुक्त करण्याची भाविकांची प्राथना

- श्यामकुमार पुरे 

अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा येथे १७० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे. येथे धुमधडाक्यात साजरी होणारी  रामनवमी कोरोनामुळे यावर्षी अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावात काढली जाणारी भव्य मिरवणूक, गावागावातून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत, मंदिरात होणारे  प्रवचन, कीर्तन, भजन, सामूहिक भंडारे, अन्नदान ही सर्व सार्वजनिक कार्यक्रम यावेळी रद्द करण्यात आले.काही चार ते पांच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा, आरती करून गुरुवारी रामनवमी साजरी करण्यात आली.

अजिंठा येथे सुमारे १८५१ मध्ये श्रीराम मंदिर बांधण्यात आले आहे.या ऐतिहासीक पुरातन मंदिरात दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येथे.पंचक्रोशीतील गावातून आलेल्या दिंडीसह गावातील भावीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते श्रीराम मंदिर परिसरात रंगोटी करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून मंदिरात मोठ्या भंडाऱ्याचे महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी केले जाते.पण यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पूजा अर्चा करून जगाला या महामारीतून लवकरच मुक्तता द्यावी अशी प्राथना रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्राला भाविकांनी केली. 

जगाला कोरोना मुक्त करण्याची प्राथनाजगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीतून जगाची सुटका व्हावी यासाठी आम्ही आज रामनवमी निमित्त प्रभू श्री रामचंद्राला साकडे घातले आहे.प्रशासनाने लोकहितासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेचे काटोकाटपणे पालन व्हावे यासाठी आम्ही दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त पूजा अरचा आरतीने रामनवमी साजरी केली. - भारत  झलवार, अध्यक्ष, श्रीराम मंदिर संस्था, अजिंठा

टॅग्स :Ram Navamiराम नवमीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस