शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७ तोळे सोन्याचे दागिने पळविले

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे या परिसरातील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे.

औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे या परिसरातील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे. सोमवारीही चोरट्यांनी गजबजलेल्या गजानन मंदिर परिसरातील सारंग सोसायटीतील एक घर भरदिवसा फोडून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती व रोख रक्कम, असा सुमारे साडेसात लाखांचा ऐवज पळविला. विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख तथा प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर हे सारंग सोसायटीत राहतात. त्यांच्या पत्नी काल मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. डॉ. लुलेकर घरी एकटेच होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नित्याप्रमाणे घराला कुलूप लावून ते विद्यापीठात निघून गेले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते घरी परत आले, तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले, कपाट तुटलेले आणि त्यातील तब्बल १७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती व ३० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा आपले घर फोडल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. लुलेकर यांनी पोलिसांना कळविले.४डॉ. लुलेकर यांनी गुन्हा घडल्यानंतर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून माहिती कळविली. घटनास्थळ मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत असल्याने नियंत्रण कक्षाने मुकुंदवाडीला तात्काळ माहिती कळविली. माहिती मिळाल्यानंतर फौजदार दिनेश सोनवणे व त्यांचे सहकारी तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचले. ४मुकुंदवाडी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अशा निष्क्रियतेमुळेच या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे.