शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

जिल्ह्यात १७ हजार मेट्रिक टन खत शिल्लक

By admin | Updated: September 24, 2014 00:16 IST

नांदेड- जिल्ह्यात रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरु झाली असून २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

नांदेड- जिल्ह्यात रबी हंगामासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव सुरु झाली असून २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात कृषी विभागाकडून नियोजन सुरु असून आजघडीला विविध दुकानदाराकडे जवळपास १७ हजार ३०० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत आणखी खत उपलब्ध होणार असल्याने खताची कमतरता भासणार नसल्याचे दिसते.यावर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतर पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने खरिपाच्या शंभर टक्के पेरण्याही होऊ शकल्या नाहीत, परंतु यानंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या रबीकडून अपेक्षा वाढल्या. यावर्षी रबी हंगामासाठी २ लाख १२ हजार १० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यात रबी ज्वार ३३ हजार हेक्टर, गहू ३७ हजार हेक्टर, हरभरा १ लाख १५ हजार हेक्टर, मका २६०० हेक्टर, करडई ४६०० हेक्टर, सूर्यफुल ९०० हेक्टर, भुईमूग १९ हजार हेक्टर व इतर अशी एकूण २ लाख १२ हजार १०० हेक्टरवर पेरणी होईल. गतवर्षी झालेली पीकनिहाय पेरणी अशी- रबी ज्वार ३०९८४ हेक्टर, गहू ३१९३२ हे., हरभरा ८२३०१ हे., मका १०६२ हे.करडई ४३३२ हे., सूर्यफुल १४३० हे., तर भुईमुगाची ८३९७ हेक्टरवर पेरणी झाली होती.जिल्ह्याला या हंगामासाठी २ लाख १९ हजार ६९६ मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. यात युरिया ८० हजार मेट्रिक टन, एसएसपी २० हजार मे.टन, डीएपी ३० हजार मेट्रिक टन, एमयुपी २० हजार मे.टन, संयुक्त खते ६४६९६ मे टन व इतर अशी एकूण २ लाख १९ हजार ६९६ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. सन २०१२-१३ च्या रबी हंगामात १ लाख ७५ हजार हे. तर २०१३-१४ च्या हंगामात १ लाख ६० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर या हंगामात रबीसाठी २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.रबीच्या पेरणीसाठी महाबीजकडून १९ हजार २८ क्विंटल तर खाजगी कंपन्याकडून ५४ हजार ९० क्विंटल बियाणाची मागणी केलेली आहे. यात रबी ज्वार २३७६ क्विंटल, गहू २९६०० क्विंटल, हरभरा ३१०५० क्विंटल, मका २०३ क्विंटल, करडई ३०८ क्विंटल, सूर्यफूल ८१ क्विंटल, भुईमूग ९५०० क्विंटल याप्रमाणे ७३ हजार ११८ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे़ (प्रतिनिधी)