शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

१६५ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:46 IST

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. ...

ठळक मुद्देगो एअरचे पाटणा-मुंबई विमान : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, एसीही पडला बंद, चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला आणि १६५ प्रवासी बालंबाल बचावले.गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाने रविवारी नेहमीप्रमाणे उड्डाण घेतले. या विमानाने १६५ प्रवासी मुंबईला जात होते. पाटण्याहून टेकआॅफ झाल्यानंतर काहीतरी घडेल, अशी कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. प्रवासाच्या अर्ध्या मार्गात विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. अशा परिस्थितीत विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. विमानातील प्रत्येक प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशा सगळ्या परिस्थितीत वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. पाटणा-मुंबई हवाई मार्गात औरंगाबाद आहे. त्यामुळे या विमानाचे औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंग क रण्याचा निर्णय घेण्यात आला.चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला गो एअरचे पाटणा- मुंबई विमानाचे आपत्कालीन लँडिंग होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विमानतळ प्राधिक रणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. वैमानिकाने सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरविले आणि विमानतळावरील प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. बºयाच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानतळावरील सुरक्षा हॉलमध्ये प्रवाशांना थांबविण्यात आले.दोन्ही इंजिनांची गती मंदावलीगो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावल्याने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विमानाचे लँडिंग सुरक्षितरीत्या झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.प्रवाशांना उलट्याविमानातील एसी बंद पडल्यामुळे दोन ते तीन प्रवाशांना उटल्या झाल्या. कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावरच होते. गो एअरचे पथक औरंगाबादला येऊन विमान दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच अन्य विमान बोलावून प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमान