केज : तालुक्यातील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात शाखांमधून एकूण १६ हजार २३४ शेतकऱ्यांनी दीड कोटीचा पीक विमा भरला आहे़३१ जुलै २०१४ ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख म्हणून शासनाने जाहीर केली़ त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केज तालुक्यातील सातही शाखेमधून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़ डीसीसीचे मुख्य प्रशासक डी़ बी़ मुकणे, मुख्याधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आणि रमजान ईद या दोन सुटीच्या दिवशी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केज तालुक्यातील सातही शाखांमधून उशिरापर्यंत शेतकऱ्यांकडून पीक विमा भरुन घेण्यात आला़ ३१ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शाखा सुरु होत्या़ त्यामुळे तालुक्यातील एकूण सात शाखांमधून १६ हजार २३४ शेतकऱ्यांनी एक कोटी ४९ लाख ९६ हजार १५२ रुपये एवढा पीक विमा भरला़ सुटीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पीक विमा भरुन घेतल्याबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत होते़केज तालुक्यातील सात शाखांमधील शाखा अधिकारी, तपासनीस आणि कर्मचारी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक मुकणे, मुख्याधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा पीक विमा भरुन घेतला, अशी माहिती जेष्ठ तपासणीस बी़ व्ही़ मांजरे यांनी दिली़ सुटीच्या दिवशीही पीक विमा भरुन घेतल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त झाले़ आता यामध्ये वाढ झाली असून १६ तारखेपर्यंत हा पीक विमा भरला जाऊ शकतो़ (वार्ताहर)शाखाशेतकरीभरलेलासंख्या पीक विमाकेज३९१४३८,४४,२७५बनसारोळा२७२९२३,९८,५७८आडस२००८२२,१८,१९३युसूफ वडगाव२३८०१४,८७,४६८होळ२८३९२३,०४,०८५नांदूरघाट१४१७१८,६७,७०१काळेगाव घाट९४७०८,७५,८५२एकूण१६,२३४१,४९,९६,१५२१६ तारखेपर्यंत विमा भरण्यास मुदतवाढपीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची उडते झुंबडकेज तालुक्यातील सगळ्याच शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दीसुटीच्या दिवशीही पीक विमा भरण्याची मोहीम सुरुचशेतकऱ्यांमधून समाधान व्यक्ततारखेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा
१६ हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST