लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बसस्थानकासमोरील बंजारा नावाच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकून माजी नगरसेवक मुस्तफासह १६ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्यावेळी करण्यात आली. दीड वर्षापूर्वीही याच हॉटेलमध्ये कारवाई केली होती. बीड शहर व दरोडा प्रतिबंधक पथकाला बसस्थानकासमोरील बंजारा हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याची खात्री करून शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकला. यावेळी मुस्तफा या माजी नगरसेवकासह एका नगरसेवकाचा चुलता गायकवाड व इतर १४ जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून पत्त्याच्या कॅटसह ३८२०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गत दीड वर्षांपूर्वी याच हॉटेलमध्ये तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
जुगार खेळताना माजी नगरसेवकासह १६ जणांना अटक
By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST