शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी १५५ हेक्टर जमिनीचे संपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:29 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील डवाळा, अगरसायगाव, शिवराई, पालखेड, गोळवाडी, घायगाव, वैजापूर ग्रामीण, करंजगाव, कनकसागज, खंबाळा, सुराळा, हडसपिंपळगांव, दहेगाव, जांबरगाव, लासूरगाव या १५ गावातील जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या गावातून महामार्गाचा ४३ कि.मी. अंतराचा रस्ता जातो. प्रशासनाने या गावातील जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु केली आहे.शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आतापर्यंत १५४.१०८३ हेक्टर क्षेत्रफळाची खरेदी करण्यात आली आहे. शेतक-यांना १२५ कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आले आहे. ११३० लाभार्थी शेतकºयांपैकी २६६ शेतकºयांनी यासाठी आवश्यक संमती दिली आहे.दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा हा मार्ग उन्नतीसाठीही पूरक ठरणार आहे. या महामार्गामुळे पंधराही गावांना उर्जितावस्था येणार आहे. सुरुवातीला या महामार्गाबद्दल असणाºया उलटसुलट चर्चेमुळे व फारशी माहिती उपलब्ध नसल्याने गैरसमजातून अनेकांनी विरोधाची भूमिका घेतली होती. परंतु जमिनीचा योग्य मोबदला व जिल्ह्याच्या दळणवळणासाठी असणारे महत्त्व पाहता हा विरोध आता कमी होत असल्याचे दिसत आहे.कोणत्याही भागाच्या प्रगतीसाठी दळणवळणाची प्रभावी साधने सहायकारी असतात. तालुक्यात लोहमार्गाचे जाळे कमी आहे. त्यामुळे महामार्गातून ती हानी भरण्याची संधी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मिळणार आहे.जिल्हा समितीकडून १५ गावांचे मूल्यांकनसमृद्धी महामार्गातील जमीन संपादित करण्यासाठी यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी समृद्धी महामार्ग यांनाच अधिकार होते. परंतु आता उपविभागीय अधिकारी तथा वैजापूर व गंगापूर तहसीलदारांना तसा अधिकार प्रधान केल्याने कामाची गती वाढली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप आणि तहसीलदार सुमन मोरे यांनी वळोवेळी शेतकºयांशी संवाद साधत येणाºया अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.या रस्त्यासाठी ४५३ हेक्टरची आवश्यकता आहे. जिल्हा समितीकडून शेतकरीनिहाय मूल्यांकननिश्चिती कामाला वेग देण्यात आला असून १५ गावांचे मूल्यांकन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ११३० भूधारकांची संमती मिळाली असून १५ गावांचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे, असे उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी सांगितले.