श्रीक्षेत्र माहूर : भारतीय स्टेट बँकेकडून यावर्षी शेतकऱ्यांना पीक कर्जापोटी १४ कोटी ३८ लक्ष रुपये वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक विनोद कोंडलकर यांनी दिली.माहूर तालुक्यात एस.बी. आय. बँक शाखा माहूर शहरात एकच शाखा असून या शाखेत २९ गावे दत्तक असल्याने बँकेवर प्रचंड ताण असतानाही यावर्षी सात गावे वाढवून देण्यात आली आहेत. आधीच माहूर तालुक्यातील ८३ गावांचा कारभार त्यातल्या त्यात पीक कर्ज वाटप यामुळे ईतर कर्ज वसुलीत कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसल्याने अधिकचा भार सहन करत पीक कर्ज वाटप करणे सुरू असून गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या ३६ कोटी पीक कर्जाची वसुली ८ कोटी झाली आहे. यावर्षी कर्ज वाटपाचा आकडा २० कोटी पर्यंत जाण्याची शक्यता शाखाधिकारी विनोद कोंडलकर यांनी वर्तविली. यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचे संकट आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली असून गतवर्षीचे कर्ज भरुन रिनीव्हल करण्याची ताकद नसलेल्या अनेक कर्ज बाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली आहेत.शासनाच्या आदेशानुसार शाखाधिकारी विनोद कोंडलकर, सचिन गोमकर, गौरव कुंभलकर, श्रीकांत गोपाले, सुमित जाधव, ईशांत बागडे, रितेश मानकर, पवन दिपसिंह, राजू वगरहांडे, मनोज वेही, गजानन गायकवाड, ठाकरे हे परिश्रम घेऊन पीककर्ज वाटप करीत आहेत. (वार्ताहर)
पीककर्जापोटी १५ कोटी वाटप
By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST