शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१४५ गावांवर टंचाईचे ढग !

By admin | Updated: June 26, 2014 23:30 IST

लातूर : पावसाळ्याचे पहिले नक्षत्र कोरडेच गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अवर्षण प्रवण स्थिती निर्माण झाली आहे.

लातूर : पावसाळ्याचे पहिले नक्षत्र कोरडेच गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अवर्षण प्रवण स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत जवळपास आटले असल्याने टंचाई आराखड्याच्या शेवटच्या टप्प्यात आता ग्रामस्थांतून पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १४५ गावांनी टँकर, अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीत दररोज नव्या गावांची भर पडू लागली आहे.शेतकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्यांच्याही नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सबंध जून कोरडाच निघून जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात केवळ एक टँकर सुरू होता. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर टंचाईचे गडद ढग दाटू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांतून ओरड सुरू झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय १३८ विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करून १४५ गावांतील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तरीही टंचाईत वरचेवर भर पडत असून, दररोज नव्या गावांचे प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल होऊ लागले आहेत. तब्बल १४५ गावांतील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने त्यांना अन्य पर्यायांद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता जुलैच्या सुरुवातीसही पाऊस झाला, तरी त्याचा पाणीपुरवठ्यासाठी लगेचच उपयोग होण्याची शक्यता नाही. सतत पाऊस झाल्यास २० जुलैनंतरच पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत उपयुक्त ठरतील. त्यामुळे पुढील महिना अडचणीचा असल्याने प्रशासनाकडून टंचाईचा अंदाज घेण्यात येत आहे. सर्वाधिक पाणीटंचाई लातूर, अहमदपूर व रेणापूर तालुक्यांमध्ये जाणवते आहे. अहमदपूरच्या ३३ गावे व ६ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाण्याची मागणी केली आहे. लातूर तालुक्यातील ३० गावे व ४ वाड्यांनी, तर रेणापूर तालुक्यातील २८ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणी देण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. औसा तालुक्यातील १०, निलंगा ९, उदगीर ८, शिरूर अनंतपाळ ४, जळकोट १ व चाकूर तालुक्यातील एका गावाने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी १११ गाव व वाड्यांवर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याशिवाय, १३ गाव, वाड्यांनी टँकरद्वारे पाण्याची मागणी केली होती. त्यापैकी ७ गाव, वाड्यांसाठी ८ टँकर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, लांबलेला पाऊस लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाने नव्याने पाणीटंचाईचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.लातूर तालुक्यात ४ टँकर...सर्वाधिक टँकर लातूर तालुक्यात सुरु आहेत़ येथील चिंचोली बल्लाळनाथमध्ये २ तर सारसा व रामेगाव तांडा येथे प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे़ अहमदूपर तालुक्यातील देवकरा व परचंडा गावांनाही टँकरद्वारे पाणी सुरु आहे़ उदगीर तालुक्यातील काशिराम तांडा, सोमला तांडा तर रेणापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथे टँकर सुरु करण्यात आले आहेत़टंचाईचा नव्याने आढावा...पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास जुलैमध्ये मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याअनुषंगाने सर्व तालुक्यांतून टंचाईचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे. जेणेकरून पाणीपुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविता येऊ शकतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. चारथळ यांनी दिली.