शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
4
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
5
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
6
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
7
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
8
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
9
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
10
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
11
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
12
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
13
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
14
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
15
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
16
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
17
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
18
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
19
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
20
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत

१४२ मजुरांचा पत्ताच नाही !

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही.

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही. तर जॉबकार्ड धारक असलेले १४३४ जणांना इतरत्र रोजगार उपलब्ध असल्याने त्यांनी कामाची आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले़ त्यामुळे सदर बोगस मजुरांची नावे कोणी घुसविली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिकसळ (ताक़ळंब) येथील महाग्रारोहयो अंतर्गत नोंदणीकृत मजुरांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे़ यात नोंदणीकृत मजुरांची संख्या ३३३१ असली तरी प्रत्यक्षात ११३३ मजुरांनी कामाची मागणी केल्याचे समोर आले असून, इतरत्र व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १८९७ असल्याचे समोर आले आहे. या एकूणच प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी १८ जून रोजी डिकसळ येथील हनुमान मंदीर ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था या महाग्रारोहयो अंतर्गतच्या रस्ता कामास भेट दिली होती़ त्यावेळी गावात नोंदणीकृत मजुरांची संख्या हजारावर असताना प्रत्यक्ष कामावर कमी उपस्थित असल्याचे जाणवले़ डिकसळ गावातीलच मजुरांना कामाची आवश्यकता आहे का ? स्थलांतर झाले आहे का ? इतरत्र कोठे काम करतात का ? आदी मुद्द्यावर प्रत्यक्ष मजुरांचा जबाब घेऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनास दिल्या होत्या़ प्रशासनाने थेट भेटी देऊन सर्वेक्षण केल्याने खळबळ उडाली आहे. अहवालानंतर समोर येणारी वस्तुस्थिती पाहता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ १३ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणतहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले़ पंचायत समिती, तहसील मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तीन तलाठी, एक ग्रामसेवक, एक रोजगार सेवक, पंचायत समितीच्या सात तांत्रिक अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. गुरूवारी दुपारपासूनच या पथकाने आपले काम सुरू केले़ एका कर्मचाऱ्याकडे जवळपास २५० ते ३०० लोकांची यादी देण्यात आली होती़ या पथकाने दोन दिवसात डोअर-टू-डोअर फिरून प्रत्यक्ष सर्वेक्षण केले़ नावानुसार घरे व व्यक्ती शोधताना या पथकाची चांगलीच दमछाक झाली़ त्यामुळे आता जिल्हाधिकारी या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)कठोर कारवाईची आवश्यकतादुष्काळी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे घेण्यात येतात. मात्र याचा लाभ गरजुंना मिळण्याऐवजी अधिकारी, गुत्तेदारांची लॉबी घेत असल्याचे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यावरुन स्पष्ट होत आहे. कळंबसह परंडा, वाशी तालुक्यातील रोहयो कामातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आता सर्वसामान्यातून होत आहे.११३३ जणांना कामाची गरजसर्वेक्षणानंतर डिकसळ येथील ११३३ जॉबकार्ड धारकांना रोजगाराची गरज असल्याचे सांगण्यात आले़ गावातील १४३४ जणांनी खासगी किंवा स्वयंरोजगार करणार असल्याचे व यातील इतरत्र नोकरी करत असतानाही मजुराच्या नोंदणी यादीत असल्याचे सूत्रांनी सांगितले़असे आहे गावचे चित्रसर्वेक्षणातील मजूर संख्या :३३३१रहिवासी असलेले :२२६५स्थलांतरित झालेले : ०५६०गावाला ज्ञात नसलेले : १४२मयत झालेले : ६२इतर व्यवसायात असलेले : १४३४मजुरीची आवश्यकता असलेले :११३३