शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१४ तास रंगली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:16 IST

गजानननगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, गारखेड्यासह नवीन औरंगाबाद परिसरातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि.५) जल्लोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गजानननगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, गारखेड्यासह नवीन औरंगाबाद परिसरातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि.५) जल्लोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला. टाळ-मृदंग, ढोल-ताशांबरोबर डीजेच्या तालावर ठेका धरून लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ गणेशभक्तांनी शिवाजीनगर येथील विहिरीत ‘श्री’च्या मूर्तींचे विसर्जन केले.घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सकाळपासूनच विसर्जन विहिरीवर गणेशभक्त दाखल होत होते. तर गणेश मंडळे दुपारनंतर ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी मिरवणुकीने निघाली. गणेशभक्तांनी गुलालाची येथेच्छ उधळण केली. पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, सूतगिरणी चौक मार्गे येणाºया गणेश मंडळाच्या स्वागतासाठी नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ, नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघ, औरंगाबाद पूर्व शहर गणेश महासंघ, श्री गजानन महाराज न्यू गणेश मित्र मंडळ, भारतीय जनता पार्टीसह राजकीय पक्षांनी व्यासपीठे उभारली होती.टाळ-मृदंगाचा गजरगजानन महाराज मंदिर परिसरातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, राजू शिंदे, भाऊसाहेब जगताप, नामदेव पवार, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बसवराज मंगरुळे, डॉ. भागवत कराड, अनिल मकरिये, दिलीप थोरात, राहुल सावंत यांच्यासह महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष बाळूसेठ कुंकुलोळ जैन, उपाध्यक्ष अ‍ॅड. विशाल राऊत, कार्याध्यक्ष मनोज चोपडा, सचिव सचिन शिरसाठ, पंजाबराव तौर, रमेश दिसागज, बाळासाहेब हरबल, विशाल डिडोरे, अनिल भराड, नारायण पारटकर, संतोष दिडवाले, अजय डिडोरे आदी उपस्थित होते. प्रारंभी महासंघाच्या व्यासपीठासमोर लेझीम आणि कवायती सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहवा मिळविली. त्यानंतर चांदीच्या रथात गणेशमूर्ती विराजमान करून मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेसह फेटा बांधून सहभागी झालेल्या भजनी मंडळाने टाळ-मृदंगाचा गजर करीत वातावरण भक्तीमय केले.महाप्रसाद, पाणी वाटपविसर्जन मार्गात ठिकठिकाणी गणेशभक्तांना शिवाजीनगर मित्र मंडळाचे जनार्दन चोपडे, प्रमोद झाडखंडे, अनिल पाटील, संदीप भुसावळकर, बाळू गाढे, ऋषभ जोगड यांनी मसाला चना, अशोक रंगदळ, सुवर्णलता रंगदळ, योगेश रंगदळ, ऋषिकेश रंगदळ, रेणुका रंगदळ यांच्यातर्फे बुंदी, जितेंद्र जाधव, सीमा जाधव, भरत आवटे, शशिकांत जाधव, करण आवटे यांच्यातर्फे शिरा, रोहित वट्टमवार, राजेश्वर वट्टमवार, चित्रा नेरकर, वंदना नेरकर, रत्नमाला वट्टमवार, रोहिणी वट्टमवार यांच्या वतीने मसाले भात तसेच राजेंद्र बेंद्रे यांनी पाणी वाटप केले.पुष्पवृष्टीने मिरवणुकीची सुरुवातऔरंगाबाद पूर्व शहर गणेश महासंघाच्या मिरवणुकीस सायंकाळी सहा वाजता पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकयेथे पुष्पवृष्टी करून सुरुवातझाली.यावेळी आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे यांच्यासह महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव जाधव पा., बाबूराव कवसकर, अशोक गायकवाड, शैलेश भिसे, सुनील देशमुख, वसंत महाराज, नंदकुमार वाखुरे, लक्ष्मण मोटे, गणेश थोरात, विकास आनंद, संकेत शेटे, कैलास राठोड आदी उपस्थित होते. नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघातर्फे आॅर्केस्ट्रॉचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष पंजाबराव वडजे पा., राजेश पवार आदी उपस्थित होते.