शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मनपाच्या एका जागेसाठी ११ जणांचे १३ अर्ज

By admin | Updated: March 30, 2016 00:45 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांचे १३ अर्ज आले आहेत़ भाजपा

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग ११ ब च्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांचे १३ अर्ज आले आहेत़ भाजपा, शिवसेनेने प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत़ तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकच अर्ज दाखल केला आहे़ प्रारंभी राष्ट्रवादी, शिवसेना व शेवटच्या अर्ध्या तासात भाजपाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला़ काँग्रेसने पोटनिवडणुकीत माघार घेतल्याने भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीत चुरस निर्माण झाली आहे़ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ अर्ज आले आहेत़ भाजपाकडून देवानंद कलशेट्टी, हाफिज मन्सुरखान यांनी अर्ज दाखल केला़ यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, आरेफ सिद्दिकी, स्वाती जाधव, शिवसिंह सिसोदिया, अफजल खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ शिवसेनेकडून वैभव बिराजदार, गणेश स्वामी यांनी अर्ज दाखल केला़ यावेळी नगरसेवक रवी सुडे, विष्णुपंत साठे, सुनिता चाळक आदींची उपस्थिती होती़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर चांदपाशा सय्यद यांचा अर्ज दाखल करण्यासाठी नगरसेवक शैलेश स्वामी, राजा मणियार, राजेंद्र इंद्राळे, रेखाताई कदम, प्रशांत पाटील, नवनाथ आल्टे, लाला सुरवसे आदींची उपस्थिती होती़ प्रभाग ब चे काँग्रेसचे नगरसेवक विक्रमसिंह चौहाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत़ पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनपात गर्दी झाली होती़ भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांसह अर्ज दाखल केला़