जालना : आषाढी एकादशिनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जालना विभागातून १२० जादा बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस १० दिवस प्रवाशांच्या सेवेत असतील.आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरते. जिल्ह्यातून हजारो भाविक पंढुरपुरला दर्शनासाठी जात असतात. १० ते २० जुलै दरम्यान चार आगारांतून १२० बसेस धावणार आहेत. मागणीनुसार मंठा, घनसावंगी, तिर्थपुरी, भोकरदन, राजूर येथील बसस्थानकातूनही बसेस सोडण्यात आल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी पी.डी.चव्हाण यांनी सांगितले. जालना आगारातून सर्वाधिक ४० बसेस धावतील तर अंबड ३५, परतूर २, आणि जाफराबाद २५ अशा एकूण १२० बसेस धावणार आहेत. तसेच पंढरपूर येथे भिमानगर शेड क्र.११ येथून बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे.
आषाढीसाठी १२० जादा बसेसची सोय
By admin | Updated: July 8, 2016 00:29 IST