सितम सोनवणे , लातूरमहिला व बालकल्याण विभागातील एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असून यातील एकच पद कार्यरत आहे़ १२ पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होत आहे़ महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ० ते ६ वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली व स्तनदा माता यांच्या प्रबोधनासाठीचे कार्य हाती घेतले आहे़ तसेच जिल्हाभरात विविध प्रकल्प राबविण्यात येतात़ त्याअंतर्गत स्वयंरोजगारासाठी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य, महिलांना शिवणयंत्र वाटप, विधवा, निराधार महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान वाटप, कुपोषण निर्मुलन अभियान, अंगणवाडीसाठी मुलांना पूरक पोषण आहार देणे़ या योजना गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी लोकसंख्येवर आधारीत १३ पदांची निर्मिती करण्यात आली आहे़ या १३ प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे मंजूरही करण्यात आली आहेत़ पण वास्तवात मात्र एकच बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत आहे़ यामुळे जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची जबाबदारी ही काही ठिकाणी सुपरवायझर, सांख्यिक सहाय्यक अशा वर्ग-३ च्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार देण्यात आला आहे़ या अतिरिक्त कामामुळे त्या कर्मचाऱ्यांना आपले काम करत या प्रकल्पातील प्रकल्पाधिकाऱ्यांचीही कामे करावी लागत आहेत. त्यामुळे योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत.ग्रामविकास विभागाकडून महिला बालकल्याणची पदे टप्प्या-टप्प्याने २०१५ पर्यंत हस्तांतरीत होणार असल्याने तसेच ग्रामविकास विभागातील पदोन्नती आणि समायोजन यामुळे महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे़ शासनाकडे पदभरती संबंधी वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱआऱ कांगणे यांनी दिली़
४बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त !
By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST