शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाच्या १२ दरवाज्यातून विसर्ग सुरू; जोरदार पावसाने पाण्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 23:53 IST

जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल झाले आहे.

ठळक मुद्देअवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९८.२५% झाला.शनिवारी धरणाच्या दरवाजा क्र १०, २७, १८, १९ या   चार दरवाजातून विसर्ग करण्यात आला रविवारी रात्री १० ते ११ या दरम्यान १६, २१, १४,  २३, १२, २५, ११, व २६ हे दरवाजे अर्धा फुटाने उघडले

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज दुपारनंतर अनेक ठिकाणी  जोरदार पावसाने हजेरी लावली. झालेल्या पावसाचे पाणी गतीने नाथसागरात दाखल होत असल्याने तातडीने रात्री १० वाजेच्या दरम्यान  धरणाचे  आणखी आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे आता धरणाच्या १२ दरवाजातून गोदावरी पात्रात ६२८८ असा विसर्ग होत आहे.

जायकवाडी धरणाचा जलसाठा सायंकाळी सहा वाजता ९८% होता. दरम्यान जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे अवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९८.२५%झाला.  गतीने धरणाच्या जलाशयात पाणी दाखल होत असल्याने जायकवाडीचे धरण अभियंता संदिप राठोड यांनी या बाबत वरिष्ठांना कल्पना दिली. जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी तातडीने धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून धरणातून विसर्ग करण्याचे आदेश दिले.

शनिवारी धरणाच्या दरवाजा क्र १०, २७, १८, १९ या   चार दरवाजातून विसर्ग करण्यात आला होता तर रविवारी रात्री १० ते ११ या दरम्यान १६, २१, १४,  २३, १२, २५, ११, व २६हे दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक्स असा विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे धरणाच्या १२ दरवाजातून ६२८८  क्युसेक्स व जलविद्युत केंद्रातून १५९० क्युसेक्स असा एकूण ७८७७ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात होत आहे. याशिवाय धरणाच्या उजव्या कालव्यातून  ६०० व डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग शुक्रवार पासून सुरू आहे. धरणात सायंकाळी ७३६७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.

धरणात जेवढी आवक सुरू होती त्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान आज नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग थोडे वाढविण्यात आले आहेत. जायकवाडी धरणातून नियंत्रित विसर्ग करण्यात येईल असे स्पष्टपणे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद