शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

११ वी प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:14 IST

अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलै रोजी ही प्रवेश प्रक्रिया संपणार होती. मात्र मुंबई, नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे सुरुवातीला वेळापत्रक बदलावे लागले. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवरून नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे यानंतर दोनदा बदल झाले. या गोंधळामुळे तब्बल महिनाभर विलंबाने प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. चौथ्या फेरीत ३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली होती. या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र ही फेरी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी १३ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तसेच चौथ्या फेरीत अलॉटमेंट केलेल्या जागा सोडूनही ११ हजार ६०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३ व १४ आॅगस्ट रोजी पाचव्या विशेष फेरीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर १८ आॅगस्ट रोजी या फेरीतील विद्यार्थ्यांची अलॉटमेंट जाहीर होईल. या फेरीतील विद्यार्थ्यांना १८ ते २१ आॅगस्टदरम्यान प्रवेश घ्यावे लागतील. या फेरीनंतरही रिक्त जागांवर तेथून पुढे स्पॉट अ‍ॅडमिशन देता येणार आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र