शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव तालुक्यात १,११८ धोकादायक व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 18:30 IST

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचा पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात १२८ सारीच्या रुग्णांसह ५५ वर्षांवरील १,११८ व्यक्ती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोयगाव : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून सोयगाव तालुक्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचा पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात १२८ सारीच्या रुग्णांसह ५५ वर्षांवरील १,११८ व्यक्ती धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोयगाव तालुका आरोग्य विभागाने दि. ९ रोजी सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना शुक्रवारी अहवाल सुपूर्द केला. या सर्वेक्षणात सोयगाव तालुक्यात तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांमध्ये १२८ सारीचे रुग्ण आढळून आले असून बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सारीच्या रुग्णांनी शतक गाठले आहे. जरंडी येथे २० आणि सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सारीचे ८ रुग्ण आढळले असून तब्बल १,११८ वृद्ध व्यक्ती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर तालुका आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. अंतिम सर्वेक्षणाअंती या उपक्रमात सोयगाव तालुक्यात नव्याने ९ कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आले असून त्यांना जरंडी कोविड केंद्रातून कोरोनामुक्त करण्यात आले असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल