लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण वाढत असून रूग्णांची संख्या १११ वर गेली आहे़ महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ४० रूग्ण आढळलेआहेत़सध्या शहराच्या विविध भागाला डेंग्यूने विळखा घातला आहे़ मागील काही दिवसांपासून शहरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ शहरात सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे़ अनेक भागांतील नाल्या तुंबल्या आहेत, असे असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कासवगतीने उपाययोजना सुरू आहेत़ नर्सींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पथके तयार करून कंटेनरची तपासणी व घरोघर कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे़वातावरणातील बदलामुळे नागरिक ताप, सर्दी, खोकल्याने हैराण असून शहरात मलेरिया, चिकुनगुनियासोबतच डेंग्यूने डोके वर काढले आहे़ शहरातील काही भागात ४० डेंग्यूचे रूग्ण आढळले असून ते खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत़ ग्रामीण भागातील डेंग्यूचे रूग्णही शहरात उपचारासाठी दाखल होत आहेत़महापालिकेने नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे़ दूषित वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे़ त्यातूनच साथीचे रोग निर्माण झाले आहेत़ घराघरांत नागरिक सर्दी, तापाने हैराण आहेत़ त्यामुळे शहरातील दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत आहे़नागरिकांनी आपल्या घर व परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष देऊन पाण्याचे साठे कोरडे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़
जिल्ह्यात डेंग्यूचे १११ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:15 IST