शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मामा-मावश्याकडून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:20 IST

आईवडील नसलेल्या सहावीत शिकणा-या बालिकेवर तिचा मामा आणि मावश्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. 7) रोजी एका शिक्षकेमुळे उघडकीस आली.

औरंगाबाद, दि. 7 - आईवडील नसलेल्या सहावीत शिकणा-या बालिकेवर तिचा मामा आणि मावश्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. 7) रोजी एका शिक्षकेमुळे उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली.मावसकाका सुधीर सुरडकर आणि मामा संतोष जुमडे (रा. मुकुंदवाडी)अशी आरोपींची नावे आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 11 वर्षीय पीडितेचे आई-वडिल मृत झालेले आहे. यामुळे तिचा सांभाळ मुकुंदवाडी येथे राहणारी तिची मावशी आणि मावसकाका आरोपी सुधीर सुरडकर हे करतात.दोन ते तीन वर्षापासून आरोपी संतोष हा सुद्धा मुकुंदवाडीत राहणा-या सुरडकर याच्याघरीच राहतो. तो सेक्युरीटी गार्डचे काम करतो. पीडितेची मावशी ही एका खासगी रुग्णालयात सफाईगार म्हणून काम करते. आरोपी मावशा हा घरीच राहतो. दोन्ही आरोपींना दारूचे व्यसन जडलेले आहे. पीडितेकडून ते घरीची धुणीभांडी करून घेतात. तिने काम न केल्यास तिला ते उपाशी ठेवतात.भीक मागून आण असे म्हणतात. वर्षभरापासून अनेकदा दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराची कोठेही वाच्यता केल्यास तुला घराबाहेर हाकलून देऊ अशी, धमकी त्यांनी तिला दिली होती. ही बाब काही दिवसापूर्वी तिने तिच्या मावशीला सांगितली, मात्र मावशीने तिच्याकडे दुुर्लक्ष करीत, याची कोठेही वाच्यता करू नको,असे बजावले. परिणामी दोन दिवसापूर्वीच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.शिक्षकेनेने कळविले पोलिसांनाआज दुपारी शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाऊ लागले, मात्र पीडिता ही वर्गातच बसून रडत होती. यावेळी शिक्षिकेने तिला काय झाले विचारले असता, ती घरी जाणार नाही, शाळेतच राहणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी अन्य शिक्षिकाही तिला भेटल्या आणि तिला त्यांनी काय झाले याविषयी सविस्तर विचारले असता आरोपी मामा आणि मावसकाकाने केलेल्या अत्याचाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. यानंतर शिक्षिकांनी या घटनेची माहिती तात्काळ मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी पीडितेच्या मावशीला आरोपी बनविले आहे.