बीड : अल्पसंख्यांक बहूल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात २०१३- १४ या वर्षात ११ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली आहे. योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यतेची मोहोर देखील उमटविली आहे.राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून अल्पसंख्यांक बहूल ग्रामपंचायत विकास सहायता निधी ही योजना राबविली जाते. त्याअंतर्गत ११ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक भागातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी मुलभूत सुविधा राबविल्या जातात. अल्पसंख्यांक विकासात कोठेही मागे राहू नयेत, त्यासाठी खास ही योजना कार्यान्वित केली आहे. २०१३- १४ मध्ये जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली. नित्रूड वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींना १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. नित्रूडला ९ लाख ९८ हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यताही दिल्या आहेत. ई- टेंडरिंंग प्रक्रिया राबवूनच कामे करावी लागणार आहेत. कामे पारदर्शक व्हावेत, यासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ४० तर अखेरच्या टप्प्यात २० टक्के इतका निधी दिला जाणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले.चालू वर्षीचे प्रस्ताव मागविले२०१४- १५ या वर्षात या योजनेला लाभ मिळविण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. यावर्षी १२ गावांना लाभ मिळणार आहे. १५ आॅगस्टपर्र्यंत प्रस्ताव सादर करता येतील. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर अंतिम मान्यतेकरता ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या गावांना मिळणार योजनेचा फायदागेवराई- तलवाडा, चकलांबा, बीड- नेकनूर, पिंपळनेर, वडवणी- उपळी, माजलगाव- पात्रूड, नित्रूड, परळी- सिरसाळा, अंबाजोगाई- सायगावया गावांची योजनेसाठी निवड झाली. शिवाय पाटोदा व आष्टी या दोन ग्रामपंचायतींनाही निधी भेटणार आहे.काय आहेत अटी ? अल्पसंख्याकबहूल ग्रामपंचायत विकास सहाय निधी या योजनेसाठी ग्रामपंचायतीअंतर्गत किमान १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ अल्पसंख्यांक असावेत.शिवाय या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.योजनेतून रस्ते, पाणी, वीज, शादीखाना, कब्रस्तान संरक्षक भिंत, नाली, हौद आदी कामे करता येतात, अशी माहिती पंचायत विभागातील कार्यालयीन अधीक्षक एस. एस. गाडे यांनी दिली.
११ ग्रा़पं़ना प्रत्येकी १० लाख
By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST