शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द

By admin | Updated: August 7, 2014 01:30 IST

नांदेड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द

नांदेड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करताना या अधिकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ जागेवर रूजू होण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी दिले आहेत़ या आदेशामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना हादरा बसला आहे़ राजकीय वरदहस्तातून जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़ या कर्मचाऱ्यांना हलविण्याची तसदी अधिकारी घेण्यास धजावत नाहीत़ मात्र ही परंपरा मोडून काढीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी या पदावर रूजू होताच प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांनी मूळ ठिकाणी रूजू होण्याच्या सूचना दिल्या होत्या़ प्रारंभी या सूचनेला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेच नाही़ गेल्या दीड महिन्यात झालेल्या बैठकांतून याबाबत वारंवार सूचना दिल्या़ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची माहितीही मागविली़ ही माहिती प्राप्त होताच जिल्ह्यातील २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मूळ जागेवर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत़ त्यात डॉ़ एल़ के़ कासराळीकर, डॉ़ पीक़े़ भुरे, डॉ़ डी़ एल़ कदम, डॉ़ फरनाज जहाँ, डॉ़ बी़ व्ही़ कदम, डॉ़ व्ही़ आऱ कदम, डॉ़ व्ही़ एम़ गायकवाड, डॉ़ आऱ एस़ कांबळे, डॉ़ एस़ एम़ कडीखाये, डॉ़ एस़ आऱ पवार, डॉ़ एऩ आऱ पवार, डॉ़ एस़ एम़ हाश्मी, डॉ़ व्ही़ एम़ भायेकर, डॉ़ आऱ जी़ बहिरवाड, डॉ़ एस़ जी़ पटवेकर, डॉ़ आऱ एऩ टोम्पे आदींचा समावेश आहे़ तर तब्बल १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांचीही प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली़ या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर होवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ जे अधिकारी-कर्मचारी आपल्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणार नाही त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगांची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ याबाबत आरोग्य सचिवांनाही कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ मान्सून कालावधीतील परिस्थिती पाहता आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश बजावले आहेत़ अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत़ याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली़ कर्मचारी मुख्यालयी आहेत की नाहीत, याबाबत खात्री करण्यासाठी ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील ही पथके प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना अचानक भेटी देतील़ स्काईपी या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचाही उपयोग केला जाणार असल्याचे डॉ़ शिंदे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती ही अपवादात्मक आणि आवश्यक स्थितीत करता येते़ ती प्रतिनियुक्तीही ठराविक कालावधीसाठी असते़ हे अधिकार विभागीय आयुक्त किंवा आरोग्य विभागाशी संबंधित असल्यास आरोग्य संचालनालयाकडून होते़