उस्मानाबाद : एखादी कंपनी असो अथवा व्यवसायिक त्यांच्याकडून फसवणूक झाल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतलेल्या १०४ ग्राहकांना दिलासा मिळाला आहे़ तर ४४ प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या विरोधात निकाल लागला असून, २१ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत़ चालू वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत ग्राहक मंचात २६७ ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ एकीकडे ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काबाबत जनजागृती व्हावी यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात शिबिरांसह जाहिराती केल्या जात असल्या तरी ग्राहक अद्याप जागरूक असल्याचे तक्रारींच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे़एखादे वाहन असो अथवा शेतीबियाणे असोत खरेदी केलेली वस्तू कोणतीही असो अथवा एखादी वस्तू उपलब्ध असतानाही ग्राहकास न देण्याचा प्रकार असो अशा ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याचे काम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमधून केले जात आहे़ विविध वस्तू, वाहने, साहित्यासह शेती बियाणे, अपघात विम्यांमध्येही अनेकांना दिलासादायक असे निर्णय जिल्हा ग्राहक मंचने दिले आहेत़ चालू वर्षी ग्राहक मंचामध्ये २६७ प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ तर १६९ प्रकरणे ही निकाली काढण्यात आली आहेत़ यात जानेवारी महिन्यात ४३ प्रकरणे दाखल असून, ९ प्रकरणे निकाली निघाली आहेत़ फेब्रुवारी महिन्यात १९ प्रकरणे दाखल असून, १५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ मार्च महिन्यात १८ प्रकरणे दाखल असून, यातील ११ प्रकरणे निकाली निघाली आहेत़ एप्रिल महिन्यात ९ प्रकरणे दाखल असून, २० प्रकरणे निकाली निघाली आहेत़ मे महिन्यात २३ प्रकरणे दाखल असून, ८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ जून महिन्यात ११ प्रकरणे नव्याने दाखल असून, २ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ जुलै महिन्यात ३९ ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ तर याच महिन्यात १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ आॅगस्ट महिन्यात १३ ग्राहकांनी तक्रारी केल्या असून, २१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ सप्टेंबर महिन्यात १५ प्रकरणे दाखल असून, २७ प्रकरणे निकाली निघाली आहेत़ आॅक्टोबर महिन्यात ३८ ग्राहकांनी ग्राहक मंचात धाव घेतली असून, २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ नोव्हेंबर महिन्यात ३९ ग्राहकांनी ग्राहक मंचात तक्रारी केल्या आहेत़ तर २१ प्रकरणे निकाली निघाली असल्याचे प्रभारी प्रबंधक यशवंत मेकेवाड यांनी सांगितले़ ग्राहक मंचात दाखल तक्रारींच्या सुनवाई अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, विद्युलता दलभंजन, सदस्य मुकुंद सस्ते यांच्यासमोर झाल्याचे मेकेवाड म्हणाले़ तक्रार निवारण मंचने दाखल तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते़ मात्र, प्रति महिना दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या जानेवारी, जुलै, आॅक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात दिसून येते़ मात्र, तीही जिल्ह्यातील ग्राहक आणि व्यवसायिक आणि होणारी फसवणूक पाहता खूपच तोकडी आहे़ (प्रतिनिधी)जानेवारी महिन्यातील ९ निकालपैकी चार निकाल ग्राहकांच्या बाजूने लागले आहेत़ फेब्रुवारी महिन्यातील १५ पैकी ११, मार्च महिन्यातील ११ पैकी ५, एप्रिल महिन्यातील २० पैकी ९, मे महिन्यात ८ पैकी ४, जून महिन्यात दोन पैकी दोन, जुलै महिन्यात १२ पैकी ८, आॅगस्ट महिन्यात २१ पैकी ११, सप्टेंबर महिन्यात २७ पैकी २१, आॅक्टोबर महिन्यात २३ पैकी १७ व नोव्हेंबर महिन्यात लागलेल्या २१ निकालापैकी १२ निकाल हे ग्राहकांच्या बाजूने लागले आहेत़२१ प्रकरणांमध्ये तडजोड४चालू वर्षी ११ महिन्यात २१ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे़ यात जानेवारीत दोन, मार्चमध्ये दोन, एप्रिलमध्ये सहा, मे मध्ये एक, आॅगस्टमध्ये पाच, सप्टेंबरमध्ये एक, आॅक्टोबरमध्ये एक तर नोव्हेंबर महिन्यात तीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत़शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायिकांकडून ग्राहकांची मोठी लूट होताना दिसत आहे़ पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या वस्तुंचेही दर निरनिराळे आहेत़ हे दर पाहता वारंवार ओरड केली जाते़ काही ठिकाणी बिले दिली जातात़ तर काही ठिकाणी बिले दिली जात नाही़ मात्र, वारंवार लूट होत असल्याची ओरड करणारे ग्राहक मात्र, तक्रार मंचमध्ये धाव घेताना दिसून येत नाहीत़ग्राहकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता४साहित्याची खरेदी करतानाच ग्रहकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे़ शासनाने ट्रेडमार्क दिलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासह प्रत्येक वस्तुची बिले घेण्याची आवश्यकता आहे़ फसवणूक झाल्यानंतर ही बिले घेवून ग्राहक मंचात ग्राहकांना न्याय मागता येण्यास मोठी मदत होणार आहे़
१०४ ग्राहकांना न्यायमंचचा दिलासा
By admin | Updated: December 24, 2014 01:00 IST