शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

१०४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST

उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़

उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़ यात गटातून ६७ तर गणातून ५६ जणांनी अर्ज काढून घेतले़ आता जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी ३८ तर पंचायत समितीच्या १८ गणासाठी ६६ असे एकूण १०४ उमेदवार आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपाने सर्वच जागांवर तर राष्ट्रवादीचे सहा ठिकाणी उमेदवार आहेत़ गणाची परिस्थिती पाहता काँग्रेस व शिवसेनेने सर्वच १८ जागांवर उमेदवार दिले आहेत़ तर राष्ट्रवादीचे केवळ १० जागांवर उमेदवार आहेत़जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून तालुक्यातील राजकीय आखाडा चांगलाच पेटला होता़ उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डींग लावली होती़ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी काहींना उमेदवारी दिली़ उमेदवारी अर्ज न मिळाल्याने काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी १०५ जणांनी अर्ज दाखल केले होते़ तर पंचायत समितीसाठी १२२ जणांनी अर्ज भरला होता़ त्यानंतर कोण अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करीत निवडणूक आखाड्यात उतरणार यावर चर्चा रंगली होती़ मात्र, नेतेमंडळींनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याने अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे़ त्यामुळे पक्षाकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे़ जिल्हा परिषदेच्या दाळींब गटात सर्वाधिक सहा तर पंचायत समितीच्या माडज गणात सर्वाधिक सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ काही गट-गणात तिरंगी तर कुठे चौरंगी लढत होत आहे़ काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वच जागांवर उमेदवार उभा केले आहेत़ मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना यावेळी पूर्ण ताकदिनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे़ तर मोजक्या जागांवर उमेदवार उभा करून त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखल्याचे दिसत आहे़ अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक चर्चेत असलेले काँग्रेसचे दगडू मोरे यांनी कुन्हाळी गटातून तर बालक मदने यांनी कवठा गटातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत़ शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांनी तुरोरी गटातील अर्ज माघारी घेत कुन्हाळीतून निवडणूक लढविणे पसंत केले आहे़ तर गुंजोटी गटातील आरपीआयचे हरिष डावरे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे़ सर्वच पक्षातील नारजांची मनधरणी करण्यात पक्षप्रमुखांना बरेचशे यश आले आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद गटातून ६७ तर पंचायत समिती गणातून ५६ जणांनी माघार घेतली आहे़ असे असले तरी त्यांची निवडणूक प्रक्रियेतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ यंदा शिवसेना व काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी होती़ तिकीट न मिळाल्याने काही जणांची नाराजी कायम असून, याचा फटका उमेदवारांना बसू नये, यासाठीही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणामध्ये नऊ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये पाच तर गणामध्ये चार उमेदवार उभे आहेत़ हे अपक्ष उमेदवार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जड जाणार आणि किती मते घेणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे़