शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचे रस्ते; कामांची तारीख सांगणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी टी. व्ही. सेंटर चौकात १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले. तीन आठवड्यांनंतरही महापालिकेने ३० पैकी एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? हिवाळ्यात सिमेंट रस्त्यांचे काम करण्यासाठी पोषक वातावरण असताना दिरंगाई का? या मुद्यावर प्रशासनाची चारही बाजूने कोंडी केली. शेवटपर्यंत प्रशासनाने कामे कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली नाही.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाची अजब भूमिका : मुख्यमंत्र्यांना भूमिपूजन करून तीन आठवडे उलटले

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी टी. व्ही. सेंटर चौकात १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले. तीन आठवड्यांनंतरही महापालिकेने ३० पैकी एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? हिवाळ्यात सिमेंट रस्त्यांचे काम करण्यासाठी पोषक वातावरण असताना दिरंगाई का? या मुद्यावर प्रशासनाची चारही बाजूने कोंडी केली. शेवटपर्यंत प्रशासनाने कामे कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली नाही.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ३० रस्त्यांची कामे सुरू होतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. मागील पंधरा दिवसांमध्ये मनपाने एकाही रस्त्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसह इतर नगरसेवकांनीही प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. १०० कोटींच्या प्रकल्पासाठी नेमलेले कार्यकारी अभियंता काकडे आणि तांत्रिक कक्षप्रमुख एम. बी. काझी यांनी खुलासा केला की, जिथे कामे करावयाची आहेत, तेथील माती परीक्षण, रस्त्यांची लेव्हलिंग करणे आदी कामे बाकी होती. ही कामे झाली असून, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येईल. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत घेतली आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार समिती नेमण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक रस्त्यावर एक माहिती फलक असेल, जेणेकरून नागरिकांना कामाची इत्थंभूत माहिती मिळेल. या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले की, दर पंधरा दिवसांनी मी स्वत: या कामांचा आढावा घेणार आहे. कामांचा दर्जा राखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल. काम कधी सुरू होणार यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी लवकरात लवकर कामे सुरू करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा