शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

संशोधनासाठी १०० कोटींचे प्रस्ताव

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

विजय सरवदे, औरंगाबाद ‘यूजीसी’कडून निधी मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिल्या

विजय सरवदे, औरंगाबाददर्जेदार व नावीन्यपूर्ण संशोधनासाठी ‘यूजीसी’कडून निधी मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिल्या असून, पहिल्या टप्प्यात किमान १०० कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी विभागप्रमुख व प्राध्यापकांनी तत्परता दर्शविली आहे.ज्या विद्यापीठांना नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले आहे ती विद्यापीठे दर्जेदार व नावीन्यपूर्ण संशोधनासाठी ‘यूजीसी’कडून ‘सेंटर फॉर पोटेन्शियल विथ एक्सलन्स’ पात्र ठरविली जातात; पण त्यासाठी विद्यापीठांकडून प्रस्ताव सादर करावे लागतात. केवळ प्रस्ताव सादर करून चालत नाही, तर प्रस्तावाचा दर्जा व गरज याबाबत ‘यूजीसी’च्या समितीसमोर परिपूर्ण सादरीकरणही करावे लागते. त्यानुसार कुलगुरू डॉ. चोपडे यांनी ४० विभागप्रमुख व त्या विभागांतील प्राध्यापकांची एक बैठक गुरुवारी अधिसभा सभागृहात घेतली. तेथे सर्व विभागप्रमुखांना ८ ते १० दिवसांत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या विद्यापीठाला नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले असून, त्याला आता वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, विद्यापीठाने ‘सेंटर फॉर पोटेन्शियल विथ एक्सलन्स’ पात्र होण्यासाठी ‘यूजीसी’कडे अद्याप प्रस्ताव दाखल केलेला नव्हता. त्यानुसार आता प्रस्ताव पाठवून विद्यापीठाला त्या केंद्रासाठी पात्र होण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी विभागाने संशोधनाचे प्रस्ताव तयार करताना ते आंतरविद्याशाखीय प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. औरंगाबाद : यामध्ये विज्ञान शाखेचे सर्व विभाग, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केमिकल टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी या विभागांनी मिळून ५ तसेच कला, सामाजिकशास्त्रे व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांनी मिळून ५ प्रस्ताव, असे एकूण पहिल्या टप्प्यात १० प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. या १० प्रस्तावांना १०० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले पाहिजे, या दृष्टीने सक्षम व दर्जेदार प्रस्ताव तयार करण्याची काळजी घेण्याचेही विभागप्रमुख व प्राध्यापकांना सांगण्यात आले आहे. प्रशासनाचा मदतीचा हात‘सेंटर फॉर पोटेन्शियल विथ एक्सलन्स’ यास पात्र होण्यासाठी ३ ते ५ विभागांनी मिळून प्रस्ताव तयार करावेत. त्यासाठी लागणारा खर्च, सादरीकरणासाठी लागणारे साहित्य, आवश्यक ते मार्गदर्शन व खर्च करण्यास विद्यापीठ प्रशासन तयार आहे. यूजीसीकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासही विद्यापीठ प्रशासन तयार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिली.शैक्षणिक ‘आॅडिट’ होणार विद्यापीठाच्या १९९४ च्या कायद्यातील तरतुदीनुसार किमान दोन वर्षांतून एकदा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक ‘आॅडिट’ करणे अनिवार्य आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालयांची उपयुक्तता, क्रीडांगणे, प्रयोगशाळा व तिचा वापर, संशोधन कार्य, अध्ययन, अध्यापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पात्र प्राध्यापकांची संख्या व त्यांचे संशोधनात्मक कार्य आदी बाबींचे शैक्षणिक लेखापरीक्षण लवकरच केले जाणार आहे. त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी केले आहे.