शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचीमुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:03 IST

पूर्वी मुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडून कंपन्या परत घेत असत. त्यावर करामध्येही त्यांना सूट मिळत असे; मात्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्यात विनानोंदणीकृत व कम्पोजिशनअंतर्गत येणाºया सुमारे ८० टक्के औषधी विक्रेत्यांना मुदतबाह्य औषधीच्या बदल्यात कोणतीही सवलत मिळत नाही. कंपन्यांनीही अशा विक्रेत्यांकडून मुदतबाह्य औषधी घेणे बंद केले आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पूर्वी मुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडून कंपन्या परत घेत असत. त्यावर करामध्येही त्यांना सूट मिळत असे; मात्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्यात विनानोंदणीकृत व कम्पोजिशनअंतर्गत येणाºया सुमारे ८० टक्के औषधी विक्रेत्यांना मुदतबाह्य औषधीच्या बदल्यात कोणतीही सवलत मिळत नाही. कंपन्यांनीही अशा विक्रेत्यांकडून मुदतबाह्य औषधी घेणे बंद केले आहे. परिणामी, १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची मुदतबाह्य औषधी राज्यातील विक्रेत्यांकडे साठली आहे. हा प्रश्न एकट्या महाराष्ट्राचा नसून संपूर्ण भारतातील औषध विक्रेत्यांचा आहे.औषधी व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार मुदतबाह्य औषधीची विल्हेवाट कायदेशीर पद्धतीनेच लावावी लागते. बाजारातील मुदतबाह्य औषधी उत्पादक कंपनीपर्यंत पोहोचविण्यासाठी एक साखळी तयार करण्यात आली आहे. यात किरकोळ विक्रेते त्यांच्याकडील मुदतबाह्य औषधी ठोक विक्रेत्याकडे पाठवीत असतो. नंतर त्यांच्याकडे जमा झालेली औषधी ठोक विक्रेता उत्पादक कंपनीकडे पाठवितो. औषध निर्माता कंपनी साक्षीदारांसमोर ही सर्व मुदतबाह्य औषधी नष्ट करतात. जीएसटीची अंमलबजावणी होण्याआधी व्हॅट (मूल्यवर्धित कर) लागू होता. व्हॅटमध्ये किमतीवर कर लागे, आता जीएसटी लागू झाल्यापासून पुरवठ्यावर कर द्यावा लागत आहे. त्यावेळी मुदतबाह्य औषधींवर ‘नो कर्मशियल व्हॅल्यू’ असा शिक्का मारला जात होता. ही औषधी कंपनीकडे ठोक विक्रेत्यामार्फत कंपनीकडे परत केल्यावर कंपनी ठोक विक्रेत्यास क्रेडिट नोट पाठवत होत्या. त्यानंतर ठोक विक्रेता किरकोळ विक्रेत्याला पुढील बिलामध्ये तेवढी रक्कम कमी करीत असे; मात्र आता ज्या किरकोळ व्यापाºयांनी जीएसटीमध्ये नोंदणी केली नाही किंवा कम्पोजिशन स्किममध्ये नोंदणी केली आहे, अशा विक्रेत्यांना मुदतबाह्य झालेला माल परत करताना त्यांनी भरणा केलेल्या कराचा परतावा त्यास मिळू शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा विचार केला तर येथे ६० हजार औषधी विक्रेते आहेत. त्यातील ८० टक्के विक्रेत्यांमध्ये काहींची जीएसटीत नोंदणी नाही, तर काहींनी कम्पोजिशन स्किममध्ये नोंदणी केली आहे. दरवर्षी औषध विक्रीत १५ हजार कोटींची उलाढाल होते. यात दरवर्षी अडीच टक्के औषधी (३७५ कोटी) मुदतबाह्य होत असतात. त्या नष्ट करण्यासाठी कंपनीला परत पाठविल्या जातात.जीएसटी लागू झाल्यापासून मागील चार महिन्यांत प्रत्येक औषधी विक्रेत्याकडे कमीत कमी २५ ते ५० हजार रुपयांची मुदतबाह्य औषधी जमा झाली आहे. राज्यात सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची मुदतबाह्य औषधी पडून असल्याची माहिती नावंदर यांनी दिली. मुदतबाह्य औषधींचा साठा दुकानात वाढत असल्याने व त्यावर मागील पाच महिन्यांत काहीच निर्णय होत नसल्याने आता विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.