शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

१० ट्रक फटाके बाजारात

By admin | Updated: October 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत १० ट्रक फटाके आणण्यात आले आहेत

औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत १० ट्रक फटाके आणण्यात आले आहेत. आकाशात फुटणारे रंगीबेरंगी थ्रीडी फटाके यंदाचे खास आकर्षण राहणार आहेत. शिवकाशी, नगर, जळगाव येथून बाजारपेठेत फटाके आणण्यात आले आहेत. औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदान, टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, राजीव गांधी क्रीडांगण, शिवाजीनगर, पडेगाव आदी भागात ३५६ स्टॉलला अग्निशामक दलाने परवानगी दिली आहे. त्यात सर्वाधिक १८० स्टॉल जि.प. मैदानावर उभारण्यात आले आहे. त्यापैकी १४० स्टॉलवर फटाके उपलब्ध झाले आहेत. येथे ८ ट्रक फटाके आणण्यात आले, तर अन्य ठिकाणी फटाक्यांचे २ ट्रक दाखल झाले. एका ट्रकमध्ये ३५० बॉक्स असतात असे ३५०० बॉक्स फटाके विक्री करण्यात येणार आहे. फटाक्यांनी दुकाना सजल्या आहेत. शिवकाशीहून आलेल्या फटाक्यांमध्ये थ्रीडी फटाके आकर्षण ठरत आहे. थ्रीडी सिनेमा, थ्रीडी टीव्ही, थ्रीडी पुस्तक आता थ्रीडी तंत्रज्ञानावर आधारित फटाकेही काही नामांकित कंपन्यांनी बाजारात आणले आहे. यात अनार, रॉकेटचा समावेश आहे. हे फटाके फुटताना पाहण्यासाठी सोबत खास गॉगलही देण्यात येत आहे, अशी माहिती फटाक्यांचे वितरक दत्ता खामगावकर यांनी दिली. फटाक्यांचे व्यापारी युनूस हुसेन म्हणाले की, यंदा शिवकाशी येथील कंपन्यांनी तयार केलेले थ्रीडी भूईचक्र नावीन्यपूर्ण ठरत आहे. लहान मुलांसाठी यंदा कागदाचे स्टॉर्च गन विक्रीला आले आहे. या गनमधून रंगीत अग्नी बाहेर पडतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आवाज होत नाही. याशिवाय २५ शॉट ते हजार शॉटपर्यंतचे फटाके उपलब्ध झाले आहेत. हजार शॉटचे फटाके अर्धा ते एक तासापर्यंत सतत एकानंतर एक आकाशात उडतात, अशा फटाक्यांना मागणी अधिक आहे. याशिवाय आकाशात ६०० ते ६५० फूट उंच जाऊन सप्तरंगाची उधळण करणाऱ्या फटाक्यांनाही मागणी आहे. याशिवाय रंगीत बॉम्ब, रंगीत फटाके, काही फटाके असे आहेत की, ते फुटताना त्यातून संगीतासारखा धून निघतो. लहान मुलांच्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके मोठ्या प्रमाणात आले आहेत. पूर्वीच्या पारंपरिक फटाक्यांना आकर्षक रूप देण्यात आले आहे. सिरॅमिक अनारही विक्रीला आले आहेत.