शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नाथसागरात दोन दिवसांत दुर्मिळ १० विदेशी पक्ष्यांचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 1:54 PM

युरोप व सायबेरियातून जायकवाडी जलाशयावर आलेल्या या पक्ष्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देलोप पावणाऱ्या प्रवर्गातील पक्षांच्या मृत्यूमुळे पक्षीप्रेमींमध्ये खळबळमृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या जलाशयात गेल्या दोन दिवसांत दहा विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे मरण पावलेले विदेशी पक्षी शेड्यूल ए प्रवर्गातील असून, लोप पावणाऱ्या प्रवर्गातील आहेत. युरोप व सायबेरियातून जायकवाडी जलाशयावर आलेल्या या पक्ष्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

जायकवाडी धरणाचे जलाशय जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने पक्षी या जलाशयावर मुक्कामी असतात.  रविवारी दुपारी टफ्टेड पोचार्ड, शेंडी बदक, कॉमन पोचार्ड, शॉवेलियर जातीचे सात विदेशी पक्षी मृतावस्थेत जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजाच्या परिसरात आढळून आले. सदरील पक्ष्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. हे मृतदेह पक्षीमित्र दिलीप भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याबाहेर काढले व वन्यजीव विभागाच्या ताब्यात दिले.  सोमवारी पुन्हा काही पक्षी मरण पावलेले आढळून आले. या पक्ष्यांनाही पक्षीमित्र दिलीप भगत यांनी पाण्याबाहेर काढले. 

दरम्यान, वन्यजीव विभागाचे भगवान परदेशी (नेवासा) यांनी पंचनामा करून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांना सादर केला. रविवारी सुटी असल्याने पैठण येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते व पक्ष्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने या पक्ष्यांचे मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांनी सांगितले. पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याची मागणी पक्षीप्रेमींमधून होत आहे. 

शेड्यूल ए मधील पक्षीजलाशयात मरण पावलेले पक्षी शेड्यूल ए प्रवर्गातील आहेत. लोप पावणाऱ्या प्रवर्गात या पक्ष्यांचा समावेश असल्याने त्यांच्या मृत्यूची घटना धक्कादायक असल्याचे पक्षीमित्र दिलीप भगत यांनी सांगितले. नाथसागर जलाशयात विदेशी पक्षी मरण पावल्याची ही पहिलीच घटना आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यAurangabadऔरंगाबाद