शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aurangabad Violence : राजाबाजार, नबाबपुऱ्यात १0 फुटांची गुलेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:12 IST

नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला

औरंगाबाद : शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला. गोफणमधून गोट्यांचा मारा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दगडांचा खच, पेट्रोल-डिझेल बॉम्बसाठी वाती, मिरची पूड घटनास्थळी सापडली आहे.

जुन्या शहराला वेठीला धरणा-या जातीय दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दंगल पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होते आहे. दंगलीत पेट्रोल-डिझेल बॉम्ब, दगडगोटे मारण्यासाठी बाहुबली, पद्मावत चित्रपटात दाखविलेल्या गुलेरचा वापर करण्यात आला. रस्त्यावरील दोन खांबांना मोठे रबर बांधून, त्याच्या मध्यभागात पोतडे ठेवले होते. या पोतड््यात फेकण्यात येणारे साहित्य ठेवण्यात येत होते. या पोतड्याला पाठीमागे ताणून धरल्यानंतर त्यातील दगडगोटे, गोट्यासह इतर साहित्य दूरवर फेकले जात असल्याचे दिसूनआले.

नवाबपुरा ते राजाबाजार रस्त्यावर गोट्यांचा (मंजे) खच पडल्याचे दिसून आले. गोफणीतून या गोट्यांचा मारा केला जाता होता. अनेक दारूच्या, पेट्रोलच्या बाटल्यांमध्येही या गोट्यांचा वापर केला. अनेक गोट्या जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीच्या टेरेसवर दगडांचा खच पडलेला होता. या ठिकाणावरून दगड मारण्यात येत होते. या इमारतीमध्ये एकूण पाच कुटुंबे राहतात. खाली दंगल पेटल्याचे दिसताच कुटुंबातील महिला, मुलांना पाठीमागच्या दरवाजातून रात्री साडेआकरा वाजता बाहेर काढण्यात आले. याचवेळी या इमारतीमध्ये दंगलखोर घुसले होते. त्यांनी सर्व मजल्यांवरील दरवाजांच्या काचा, ड्रेनेजचे पाईप उद्ध्वस्त केले. याच इमारतीत मिरची पूड टाकलेली होती.

या इमारतीचा ताबाच सकाळी आठ वाजेपर्यंत दंगलखोरांकडे होता. टेरेसवर पोत्यांमधून आलेल्या दगडगोट्यांची कोणतीही कल्पना नसल्याचे इमारतीचे मालक अब्दुल समद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कुटुंबातील सदस्य जिवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यानंतर इमारतीत कोण आले, याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस