शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१०९ प्रकल्प कोरडेठाकच

By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST

उस्मानाबाद : यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असून, पावसाळ्याची दोन महिने सरली आहेत़ मात्र, निम्मा पावसाळा सरला तरी मोठ्या पावसांअभावी जिल्ह्यातील प्रकल्पात ठणठणाट आहे़

उस्मानाबाद : यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असून, पावसाळ्याची दोन महिने सरली आहेत़ मात्र, निम्मा पावसाळा सरला तरी मोठ्या पावसांअभावी जिल्ह्यातील प्रकल्पात ठणठणाट आहे़ अद्यापही जिल्ह्यातील तब्बल १०९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ तर ९६ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली असून, मोजक्याच प्रकल्पांमध्ये केवळ १़२० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़मागील तीन-चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्हावासियांना यंदा पावसाने काहीसा दिलासा दिला आहे़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याच्या बहुतांश भागात झाला आहे़ तुळजापूर, भूम तालुक्यात पावसाने सर्वाधिक हजेरी लावली आहे़ असे असले तरी जिल्ह्यात आजवर केवळ हलक्या आणि काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे़ परिणामी जिल्ह्यातील तब्बल १०९ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत़ जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्प आहेत़ सध्या १०९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ ९६ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे़ शिवाय ८ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी तर एका प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यादरम्यान पाणी आहे़ एक प्रकल्प ५१ ते ७५ टक्के दरम्यान असून, एका प्रकल्पात ७५ टक्क्यांच्या वर पाणीसाठा आहे़ या प्रकल्पांमध्ये सध्या ७.८१५ दलघमी म्हणजे १़२० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ सध्या मोठा सिना-कोळेगाव प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ मोठे व लघू प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही़ निम्न तेरणातही केवळ गाळयुक्त पाणीसाठा आहे़ लघू प्रकल्पांमध्ये ७़८१५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ प्रकल्पनिहाय परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, तेरणा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाकच आहेत़ तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात १़०६७ दलघमी, खंडाळा प्रकल्पात ०़८९२ दलघमी, उमरगा तालुक्यातील तुरोरी प्रकल्पात ०़३३२ दलघमी, भूम तालुक्यातील बाणगंगा प्रकल्पात ०़५२४ दलघमी पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुळजापूर तालुक्यातील हरणी, कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील खंडेश्वर हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़ इतर प्रकल्पाची पातळी जोत्याखाली आहे़ लघू प्रकल्पांची परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर प्रकल्पात ०़१२१ दलघमी, तुळजापूर तालुक्यातील कामठा प्रकल्पात ०़०३० दलघमी, व्होर्टी प्रकल्पात ०़०९० दलघमी, सांगवी माळुंब्रा प्रकल्पात ०़१६० दलघमी, कुनसावळी ०़०८० दलघमी, सिंदगाव ०़३१० दलघमी, सलगरा मड्डी ०़०९६ दलघमी, मुरटा ०़०५८ दलघमी, हंगरगा नळ ०़२५० दलघमी, व्होर्टी सा़त़१ ०़०४४ दलघमी, शहापूर ०़२८० दलघमी, खुदावाडी ०़१८० दलघमी, वडगाव देव ०़०८० दलघमी, सलगरा दिवटी ०़२८० दलघमी, वाणेगाव ०़०७० दलघमी, लोहगाव ०़१२४ दलघमी, नंदगाव ०़१३४ दलघमी, किलज ०़१२० दलघमी, चिवरी उमरगा ०़०५० दलघमी, मुरटा ०़१६० दलघमी, जळकोट ०़५०२ दलघमी, अलीयाबाद ०़४९७ दलघमी, व्होर्टी ०़१५० दलघमी, येडोळा ०़१२२ दलघमी, चिकुंद्रा व कुंभारीकोरेवाडी प्रत्येकी ०़०८० दलघमी, अचलेर ०़१०० दलघमी, कोळसूर ०़४२२ दलघमी, केसरजवळगा ०़१२२ दलघमी पाणीसाठा आहे़ उमरगा तालुक्यातील भिकार सारोळा येथे २़७६४ दलघमी, कळंब तालुक्यातील येरमाळा ०़११९ दलघमी, चोराखळी ०़४९६ दलघमी, वडजी ०़०७० दलघमी, मलकापूर ०़१२१ दलघमी, भूम तालुक्यातील आरसोली येथील प्रकल्पात ०़७१९ दलघमी, जांब ०़०६० दलघमी, नांदगाव ०़८४२ दलघमी, वाकवड ०़१४० दलघमी, वाशी तालुक्यातील दहिफळ येथे ०़०५० दलघमी, इराचीवाडी ०़०६० दलघमी, पारा एक ०़०४० दलघमी, पारा दोन ०़०५० दलघमी साठा आहे़