शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ६३ गणेश मंडळे

By admin | Updated: August 29, 2014 01:26 IST

हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १ हजार ६३ गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे नोंदणी केलेली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण १ हजार ६३ गणेश मंडळांनी पोलीस विभागाकडे नोंदणी केलेली आहे. यातील ३१४ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील शहरी भागांमध्ये यंदा २६५ तर ग्रामीण भागात ७९८ गणेश मंडळ स्थापन झाले आहेत. मागील वर्षी साधारणत: १ हजार गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची मुर्ती स्थापन केली होती. दरम्यान, सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मंडळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हाभरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त लावला आहे. याशिवाय इतरही अनेक उपाययोजना करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार (हिंगोली शहर), निलेश मोरे (हिंगोली ग्रामीण), पियुष जगताप (वसमत) पोनि, सपोनि, उपनिरीक्षक दर्जाचे ३५ अधिकारी व ८०० कर्मचारी या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२ ची एक कंपनी, नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रातील २५ महिला पोलीस, लातूरच्या प्रशिक्षण केंद्राचे ५० पुरूष कर्मचारी, गृहरक्षक दलातील ३०० पुरूष व २५ महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. या शिवाय मुंबईतील मरोळ येथील प्रशिक्षण केंद्रातील अप्पर पोलीस अधीक्षकही बंदोबस्तासाठी जिल्ह्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक एम.एम. कारेगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)