शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जेवणाचे लावले १ कोटीचे अतिरिक्त बिल; बीड लोकसभा निवडणूक खर्चात ८ कोटींचा गैरव्यवहार रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:35 IST

विभागीय पातळीपासून निवडणुक आयोगापर्यंत तक्रारी गेल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती.

ठळक मुद्देबीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी पांडेय यांच्यासह १४ अधिकाऱ्यांवर ठपका

औरंगाबाद / बीड : गेल्यावर्षी मे महिन्यांत झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ८ कोटी १८ लाखांचा गैरव्यवहार रोखल्याची माहिती चौकशीअंती समोर आली असून याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय यांच्यासह १४ जणांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. जानेवारी २०२० पासून हे प्रकरण गाजत असून, विभागीय पातळीपासून निवडणुक आयोगापर्यंत तक्रारी गेल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती.

तत्कालीन जिल्हाधिकारी पांडेय यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर ( माजलगाव ) प्रभोदय मुळे ( बीड ) नम्रता चाटे ( पाटोदा ) शोभा जाधव (अंबाजोगाई) गणेश महाडिक (परळी वैजीनाथ ) यांना जबाबदार धरले आहे. याशिवाय संगीता चव्हाण ( गेवराई ) प्रतिभा गोरे (माजलगाव) अविनाश शिंगटे ( बीड) हिरामण झिरवाळ (आष्टी) मेंडके (केज) बिपीन पाटील (परळी) या सहा तहसीलदारांवर ठपका ठेवला आहे.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित देशमुख यांनी याप्रकरणात आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणुकीचा नऊ विविध शीर्षकाखाली १६ कोटी ५३ लाख रुपये खर्च दाखविला होता. त्यातला ८ कोटी १८ लाख रुपये खर्च चौकशी समितीने वगळला असून ८ कोटी ९ लाख रुपये खर्चाच्या बारा मुद्यांवर आधारित चौकशी झाली. पाच सदस्यीय चौकशी समितीने अन्य एका तक्रारीत क्लीनचीट दिल्यानंतर पुन्हा नियुक्त सहा सदस्यीय समितीने अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. यात सरकारचे तब्बल ८ कोटी १८ लाख ९ हजार ७४० रुपये वाचले असल्याचे ॲड. देशमुख यांनी सांगितले. निवडणुक खर्चातील देण्यात आलेल्या बिलांच्या पडताळणीअंती मोठ्या प्रमाणावर खर्च कपात केल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लोकमतला दिली. 

चहा, भोजनात १ कोटींचे शिल्लक बिलवेब कास्टिंगमध्ये २ कोटी २० लाख १३ हजार ८४४ बिल होते. यात १ कोटी ८० लाख १० लाख ३४४ रुपये अतिरिक्त होते. जी.पी.एस.साठी ४७ लाख ९७,१३५ रुपयांचे देयक जोडले. त्यात १९ लाख १८,८४९ रुपये अतिरिक्त होते. मंडप, फर्निचर, लाईटचे देयक ६,६०,३०,२६९ होते. यात ३,४५,११,६१० रुपये, व्हिडीओ कॅमेराचे देयक १,९३,५४,६८० लावले होते, यात १,२०,९६,९८६ रुपये तर चहा, नाष्टा, भोजनचे २,००,७३,९३९ देयक होते. यात १,०८,१२,१९० रुपये अतिरिक्त लावले होते. संगणक, प्रिंटर, एल. सी. डी., डिश टीव्ही, सीसीटीव्हीचे देयक १,६१,५९,००९ होते. यात २७,९३,३३१ रुपये, खाजगी वाहन पुरवठाचे ६८,१३,००० देयक होते, यात ३,५२,६०० रुपये अतिरिक्त होते. साहित्य, स्टेशनरीचे ४९,५५,७१० देयक सादर केले होते हे मान्य झाले. हमाल, मजूर पुरवठा देयक ५१,१८,२०० सादर केले होते. यात १३,१३,८३० रुपये चौकशीअंती कमी झाले आहेत. 

टॅग्स :BeedबीडfundsनिधीElectionनिवडणूक