शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचा ४६ टक्के निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:04 IST

२०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपण्यावर असतानाही जिल्हा परिषदेचा ४६ टक्के निधी अखर्चित आहे. मार्च एडिंगच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने शेवटच्या महिन्यात कामांचे नियोजन करून अखर्चित निधी खर्च करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देमार्च एन्डिंगची धावपळ : शेवटच्या महिन्यात विविध कामांचे नियोजन

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपण्यावर असतानाही जिल्हा परिषदेचा ४६ टक्के निधी अखर्चित आहे. मार्च एडिंगच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने शेवटच्या महिन्यात कामांचे नियोजन करून अखर्चित निधी खर्च करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कामांना गती मिळणार असली तरी निधी खर्च करण्याच्या नादात निकृष्ठ दर्जाची कामे होण्याची शक्यता बळावली आहे.जिल्हा निधी अंतर्गत जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून जवळपास ४४ कोटींचा निधी मिळाला. यापैकी डिसेंबर महिन्याअखेर ५४ टक्के निधी खर्च झाला आहे. तर ४६ निधी अखर्चित आहे. ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च करायचा असून अखर्चित राहिलेला निधी शासनाला परत जाणार आहे.शासनाकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध विभाग अंतर्गत विकास कामे व जनहिताच्या योजना राबवून निधी खर्च केला जातो. मात्र निधी खर्चाचे नियोजनास विलंब होत असल्याने सर्वसाधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ध्याहून अधिक निधी अखर्चित राहत असते. योजना राबविणे, अंमलवजावणी, नियोजन, लाभार्थी निवड अशा बाबी पार पाडण्यास दरवर्षीच डिसेंबर महिना उलटत असते. त्यानंतर मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जाते. मात्र या दोन महिन्यात कामाच्या दर्जाकडे कोणतेही लक्ष देत नाही, निधी खर्च झाला पाहिजे, यासाठी प्रत्येकाचीच धावपळ असते.दरवर्षी १० ते १५ टक्के अखर्चित निधी शासनाला परत जात असते. यावर्षीही तिच स्थिती दिसून येत असून निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची धावपळ सुरू झाली आहे. मात्र या धावपळीत विकास कामांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असून खºया लाभार्थ्यांनाही योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत आहे.कृषी व पशुसंवर्धन विभाग सर्वात मागेजिल्हा निधी अंतर्गत जिल्हा परिषदेला मिळालेला निधी सर्व विभागाला वाटून दिला जातो. मात्र अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यावर्षी मिळालेला निधी खर्च करण्यास इतर विभागाच्या तुलनेत बराच मागे पडला आहे. कृषी विभागाला २ कोटी ११ लाखांचा निधी मिळाला होता. मात्र आतापर्यंत केवळ १८ लाखांचा निधी खर्च झाला आहे. तर पशुसंवर्धन विभागाला ६० लाखांचा निधी मिळाल्यानंतर केवळ २ लाख २३ हजार रूपयेच खर्च झाले आहेत. यावर्षी खरिप हंगामात पिकांवर विविध रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र निधी असतानाही जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.अर्थ समितीची सभा गुंडाळलीशुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. अखर्चित निधीवर सर्व विभाग प्रमुखांना निधी खर्च करण्याचे नियोजन करण्याचे सांगून ही सभा अर्धा तासात गुंडाळण्यात आली.