शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. लाखोंच्या मालमत्ताकराला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा खर्च काढून काही सुविधा ग्रामपंचायतीला पुरविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देएमआयडीसी करणार वसुली : १५ ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचा ग्रामपंचायतचा अधिकार काढून घेतल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसणार असून लाखोंच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. या नवीन निर्णयामुळे जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या १५ ग्रामपंचायतींच्या उत्पन्नालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा खर्च काढून काही सुविधा ग्रामपंचायतीला पुरविण्यात येणार आहेत. चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत ताडाळी, चिचाळा, मोरवा, नागाळा, साखरवाही, येरूर व भद्रावती, मूल, वरोरा तालुक्याच्या ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मालमत्ता करावर यापुढे निर्बंध येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता करातून वसुली होणाऱ्या रकमेतून ५० टक्के रक्कम महामंडळाकडून ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीत जमा होणार आहे. उरलेल्या ५० टक्के रकमातून औद्यगिक क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी खर्च करणार आहे. त्यामुळे आता औद्योगिक क्षेत्र असलेल्या गावांना काही सुविधांच्या अटींवर एमआयडीसीला कर द्यावा लागणार आहेत. ग्रामपंचायतच्या हद्दीतील कारखान्यांकडून पंचायत विभागाला लाखोंचा मालमत्ता कर मिळत होता. या करातून गावाचा विकास साधण्यासाठी मदत होती. मात्र नवीन निर्णयामुळे जिल्हा परिषदेला या कराला मुकावे लागणार आहे.कर थकविणाऱ्या कंपन्या येणार वठणीवरमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम १९६० अनुसार यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील विविध कर आणि फी आकारणी व वसूल करण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मात्र, जिल्हा परिषदेतील ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायतींनी करवसुलीसाठी उद्योग कंपन्यांना नोटीसा देऊनही त्या जुमानत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही विहित कालावधीत वसुली होत नाही. नवीन निर्णयानुसार कर वसुलीची जबाबदारी एमआयडीसीची आहे. यातून उत्पन्नाला काही प्रमाणात फटका बसेल. पण कर थकविणाऱ्या कंपन्या वठणीवर येऊ शकतात, अशी माहिती जि. प. च्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना दिली.अशी होणार करवसुलीग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन, इमारती आणि मालमत्तांवरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर, दिवाबत्ती, मालमत्ता कराची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसी करणार आहे. वसुलीतील ५० टक्के रक्कम गटविकास अधिकारी पंचायत समितीकडून प्रमाणित करून आणलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या खात्यावरच जमा केली जाणार आहे. महामंडळाने प्रत्येक माहिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्यात वसूल झालेल्या कराचा ५० टक्के वाटा स्वत:कडे ठेवेल. उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यात १४ अशा शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या मालमत्ताकराबाबत नवीन निर्णय घेतला. त्यानुसार पद्धत बदलविण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायतींची माहिती मागविण्यात येणार आहे.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.

टॅग्स :zpजिल्हा परिषद